रक्षाबंधनाला फक्त 2754 रुपयात घरी घेऊन या ‘ही’ Electric Scooter; बहिणीला द्या आकर्षक गिफ्ट

टाइम्स मराठी । ऑगस्ट महिन्यातील पौर्णिमेला बहिण भावांचा पवित्र सण रक्षाबंधन हा साजरा केला जातो. या पवित्र सणाच्या दिवशी भाऊ बहिणीला गिफ्ट देतो. तुम्ही देखील तुमच्या बहिणीला या रक्षाबंधनाच्या दिवशी काही खास गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरचा विचार करू शकतात. आज-काल इलेक्ट्रिक स्कूटर प्रत्येकाला आकर्षित करत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर महाग असली तरी देखील आज आम्ही तुम्हाला अशी ही ऑफर सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही फक्त 2754 रुपयांमध्ये रक्षाबंधनला ही स्कूटर बहिणीला गिफ्ट देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर

   

काय आहे ऑफर ?

Tunwal Storm ZX असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव असून 88000 रुपयांच्या एक शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे. परंतु तुम्ही हप्त्यावर देखील ही स्कूटर घरी आणू शकतात. त्यासाठी तुम्हाला 2754 हप्ता भरून हे इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणता येईल. आणि रक्षाबंधनाला बहिणीला खास गिफ्ट म्हणून देखील तुम्ही ही स्कूटर देऊ शकता.

Tunwal Storm ZX बॅटरी आणि रेंज

Tunwal Storm ZX या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 60V, 26Ah कॅपॅसिटी असलेली लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी तुम्ही स्कूटर सोबत येणाऱ्या चार्जरने चार्ज केल्यास चार ते पाच घंटांमध्ये फुल चार्जिंग होते. ही स्कूटर एकदा फुल चार्ज झाल्यानंतर तब्बल 120 किलोमीटर पर्यंत रायडिंग रेंज देते. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक स्कुटरचे टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतकं आहे.

फिचर्स

Tunwal Storm ZX या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देण्यात आलेल्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यात पुश बटन स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, ईबीएस, एलईडी हेडलाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प ,अलोय व्हील्स, ट्यूबलेस टायर यासारख्या फीचर्स ने परिपूर्ण आहे.

ब्रेकिंग सिस्टीम

Tunwal Storm ZX या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये ब्रेकिंग सिस्टीम सोबतच कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम जोडण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर च्या फ्रंट व्हील मध्ये डिस्क ब्रेक देण्यात आलेला असून रियर मध्ये ड्रम ब्रेक उपलब्ध आहे. यामध्ये देण्यात आलेल्या सस्पेन्शन सिस्टीम मध्ये फ्रंटला हायड्रोलिक सस्पेन्शन आणि रियल साईडला स्प्रिंग बेस्ड शॉक एब्जॉर्बर लावण्यात आले आहे. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 250 वॅट ची मजबूत इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर BLDC टेक्नॉलॉजी वर आधारित आहे.