Whatsapp वर कोणी Block केल्यास असं करा Unblock; फॉलो करा या स्टेप्स

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. यानुसारच व्हाट्सअप आता कम्युनिकेशनच एक खास साधन बनले आहे. त्यानुसार बऱ्याचदा भांडण झाल्यास आपला पार्टनर किंवा एखादा व्यक्ती आपल्याला व्हाट्सअप वर ब्लॉक करतो. ब्लॉक केल्यामुळे आपण त्या व्यक्तीसोबत पुन्हा बोलू शकत नाही. किंवा आपण पाठवलेले मेसेज ब्लॉक असल्यामुळे त्या व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आपल्याला आपले मत पार्टनर सोबत शेअर करता येत नाही. अशावेळी आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत. या ट्रिकच्या माध्यमातून जर तुम्हाला तुमच्या पार्टनर ने ब्लॉक केले असेल तर तुम्ही स्वतःला अनब्लॉक करू शकतात. तुम्हाला त्यासाठी ही ट्रिक वापरावी लागेल.

   

आधी या पद्धतीने जाणून घ्या तुम्ही व्हाट्सअपवर ब्लॉक आहात की नाही

अनब्लॉक करण्याची ही ट्रिक वापरण्यापूर्वी तुम्ही खरंच ब्लॉक आहात का हे जाणून घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही पार्टनरला व्हाट्सअप वरून मेसेज सेंड केला. परंतु तो मेसेज डबल टिक झाला नसेल किंवा बऱ्याच वेळा पासून सिंगल टिक दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या पार्टनर ने ब्लॉक केले आहे.

ही ट्रिक वापरून करू शकतात अनब्लॉक

जर तुमच्या पार्टनर ने तुम्हाला ब्लॉक केले असेल तर तुम्ही या ट्रिक चा वापर करून स्वतःला अनब्लॉक करू शकतात. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचे व्हाट्सअप अकाउंट डिलीट करावे लागेल. त्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करून साइन- अप करू शकतात. असे केल्यास तुमचे अकाउंट काहीही न करता अनब्लॉक होईल. परंतु यासाठी तुम्हाला बॅकअप मिळणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागेल.

जर तुम्हाला तुमचे अकाउंट डिलीट करायचे असेल तर ही प्रोसेस फॉलो करा

1) सर्वात पहिले Whatsapp ओपन करा.
2) त्यानंतर Whatsapp च्या सेटिंग मध्ये जा.
3) सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अकाउंट ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
4) त्यानंतर अकाउंट सेटिंग मध्ये तुम्हाला डिलीट माय अकाउंट लिंक दिसेल.
5) त्या ऑप्शनवर क्लिक करा.
6) त्यानंतर तुम्हाला तुमचा देशाचा कोड टाकून मोबाईल नंबर टाकावा लागेल.
7) त्यानंतर डिलीट माय अकाउंट हे ऑप्शन वर क्लिक करा. यानंतर तुमचा अकाउंट डिलीट होईल.

अकाउंट पूर्णपणे डिलीट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा व्हाट्सअप इन्स्टॉल करून अकाउंट बनवू शकतात. आणि तुम्हाला अनब्लॉक केलेल्या पार्टनर सोबत चॅट करू शकतात.

आणखी एक पर्याय आहे-

याशिवाय तुम्ही आणखीन एका ऑप्शनचा वापर करू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्राला एक Whatsapp ग्रुप बनवायला सांगावा लागेल. व्हाट्सअप ग्रुप बनवल्यानंतर तुमचा पार्टनर मित्र आणि तुम्ही तिघांना जॉईन व्हावे लागेल. आणि या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही तुमचे मेसेज पार्टनर पर्यंत पोहोचवू शकतात.