Flex-Fuel MPV : देशातील पहिली Ethanol Car लाँच; पेट्रोल- डिझेलपासून होणार सुटका

Flex-Fuel MPV | पेट्रोल आणि डीझेलची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. या गाड्याच्या अती वापरामुळे पर्यावरणाला सुद्धा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे आपण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याकडे वळत आहे. परंतु आता इलेक्ट्रिक गाड्या विकणाऱ्या कंपन्यांना सुद्धा धोक्याची घंटा आहे. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इथेनॉलवर चालणाऱ्या कारचे उदघाटन झालं आहे. Toyota Innova हायक्रोस असं या इथेनॉलवर धावणाऱ्या गाडीचे नाव आहे. इथेनॉलवर चालणारी देशातील ही पहिलीच गाडी आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक प्रकारचीच क्रांती म्हणावी लागेल.

   

ही कार देशातील पहिली BS-6 (stage-2) electrified flex-fuel कार आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स-इंधन एमपीव्ही (Flex-Fuel MPV) पूर्णपणे इथेनॉलवर चालेल. इथेनॉलला E100 ग्रेड दिलेला आहे, जे सूचित करते की कार पूर्णपणे पर्यायी इंधनावर चालते. १०० टक्के इथेनॉलवर चालणारी ही कार खास करून पर्यावरणासाठी तर पूरक असेलच पण याशिवाय सर्वसामान्य जनतेचा खर्च कमी करण्यासही मदत करेल. तसेच ही कार केवळ पर्यायी इंधनाचा वापर करणार नाही, तर ती स्वतः इलेक्ट्रिक पॉवर निर्माण करण्यास सक्षम असेल आणि ईव्ही मोडवरही चालण्यास सक्षम असेल. गेल्या वर्षी, गडकरींनी टोयोटा मिराई ईव्ही सादर केली होती. जी पूर्णपणे हायड्रोजन-निर्मित विजेवर चालते. आता देशात इथेनॉल कार लाँच झाल्याने नव्या भारतचे नवं पर्व म्हणायला हरकत नाही.

23.24 किलोमीटर रेंज- Flex-Fuel MPV

टोयोटाच्या या MPV मध्ये लिथियम-आयन बॅटरी पॅक देखील असेल जो कारला ईव्ही मोडवर चालण्यास मदत करण्यासाठी पुरेशी उर्जा निर्माण करण्यास सक्षम असेल. तसेच इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड 2.0-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते हे इंजन 181 bhp पॉवर आणि जनरेट करते तसेच 23.24 किलोमीटर प्रति लिटर रेंज दाते. कारचे इंजिन ई-सीव्हीटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. इथेनॉल कारचे फायदे म्हणजे दरवर्षी १६ लाख करोड रुपये भारत केवळ पेट्रोल विकत घेण्यात खर्च करतोय, तो खर्च वाचण्यास मदत होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथेनॉल शेतकरी तयार करत असल्याने शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान गडकरी म्हणाले, “आपल्या देशातील 40 टक्के प्रदूषण हे वाहनांच्या प्रदूषणामुळे होते. दिल्लीतील रहिवाशांना वाहनांच्या प्रदूषणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे जैवइंधन किंवा पर्यायी क्लिनर इंधनासाठी भारताच्या प्रयत्नाला गेल्या वर्षी गती मिळाली जेव्हा केंद्राने इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणले. आता 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.