Vivo V29e : 50MP च्या फ्रंट कॅमेरासह Vivo ने लाँच केला जबरदस्त Mobile; पहा किंमत

टाइम्स मराठी । आज-काल 5G स्मार्टफोन खरेदी करण्याकडे सर्वांचा कल आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ब्रँड विवो कंपनीने सोमवारी Vivo V29e हा आपला नवा 5G स्मार्टफोन लॉन्च केला. एकूण 2 स्टोरेज वेरियंट मध्ये हा मोबाईल लाँच करण्यात आला असून त्याच्या किमतीही त्यानुसार वेगवेगळ्या आहेत. या स्मार्टफोन साठी प्री ऑर्डर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच या स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफर देखील उपलब्ध आहेत. चला तर मग विवोच्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याची किंमत याबात जाणून घेऊयात.

   

6.78 इंच डिस्प्ले –

Vivo V29e या 5g स्मार्टफोन मध्ये 120 hz रिफ्रेश रेट सह 6.78 इंचाचा FHD + 58.7 डिग्री थ्रीडी कर्व्ह डिस्प्ले मिळतोय. मोबाईल मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला असून Android 13 वर आधारित Funtouch ऑपरेटिंग सिस्टम फोनमध्ये उपलब्ध आहे . विवो चा हा मोबाईल 7.5 मिमी स्लिम असून त्याचे वजन 180.5 ग्रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. ही बॅटरी 44 W च्या फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते.

कॅमेरा– Vivo V29e

Vivo V29e या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 64 MP, सेकंडरी कॅमेरा 8MP चा आहे तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरा पंच हॉल डिझाईन सोबत उपलब्ध आहे.

कनेक्टिव्हिटी

Vivo V29e स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेल्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 5G, 4G, 3G, 2G, wifi, GPS, NFC, ब्लूटूथ एफएम रेडिओ 3.5mm ऑडिओ जॅक आणि चार्जिंग साठी युएसबी सी टाईप चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड फनटच ऑपरेटिंग सिस्टीम ला सपोर्ट करतो.

किंमत किती ?

V29e या 5G स्मार्टफोन मध्ये दोन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. यातील 8GB रॅम 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या वेरियंट ची किंमत 26,999 रुपये एवढी आहे. त्याचबरोबर 8GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या वेरियंट ची किंमत 28,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी करू शकता. यासोबतच कंपनीने वेगवेगळ्या ऑफर देखील यात उपलब्ध केले आहेत. जर तुम्ही हा स्मार्टफोन एचडीएफसी बँक आणि एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड ने पेमेंट करून घेत असाल तर तुम्हाला 2500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. यासोबतच कंपनीने एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्ही कोणताही जुना मोबाईल एक्सचेंज करून हा नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला 2000 रुपयांचा ॲडिशनल एक्सचेंज बोनस मिळणार आहे.