टाइम्स मराठी । टोयोटा किर्लोस्कर कंपनीने आज टोयोटा रुमीयन MPV ही कार (Toyota Rumion MPV) इंडियन मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त विक्री झालेली 7 सीटर MPV मारुती सुझुकी आर्टिगावर ही कार बेस्ड आहे. बेस्ट डिझाईन अँड फीचर्स मध्ये उपलब्ध असलेली टोयोटा रुमीयन ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. स्टायलिश प्रीमियम एस्टीरियल डिझाईन, स्पेसिअस कम्फर्टेबल इंटरियर आणि पावर फुल इंजन ने सुसज्ज असलेली टोयोटाची ही नवीन रुमियन 10.29 लाख रुपयांचा एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे. आज आपण टोयोटाच्या या कारचे खास फीचर्स जणूं घेऊयात.
लूक आणि डिझाईन –
टोयोटा रुमीयन MPV या कारच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये आर्टिकाच्या तुलनेत कॉस्मेटिक चेंजेस करण्यात आले आहे. या सोबतच फ्रंट ग्रील मध्ये देखील काही बदल करण्यात आले. या कारच्या ग्रीलमध्ये हनीकॉम्ब पॅटर्न उपलब्ध आहे. यासोबतच ग्रील मध्ये इंटिग्रेटेड LED DRLs सह LED प्रोजेक्टर हेड लँड सेटअप देखील उपलब्ध आहे. यासोबतच कारमध्ये फ्रंट बंपरला नवीन डिझाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. गाडीच्या खालच्या भागात क्रोम एलिमेंट्स वापरले असून यात दोन्ही फोग लॅम्प उपलब्ध आहे. कारच्या साईडला सात स्पोक डायमंड कट आलोय व्हील देण्यात आले आहे. टोयोटा रुमीयन MPV कारच्या साईड आणि रियर प्रोफाइल मध्ये काही बदल करण्यात आलेले नसून इंटिरियर मध्ये आर्टिका सारखे ड्युअल टोन ट्रीटमेंट उपलब्ध आहे.
इंजिन – (Toyota Rumion MPV)
टोयोटा रुमीयन MPV या कारमध्ये 1.5 लिटर नॅचरली इन्स्पिरेटेड पेट्रोल इंजन देण्यात आले आहे. हे इंजन 103hp पावर 137nm पीक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये देण्यात आलेल्या इंजिन सोबतच 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आणि 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले आहे. यासोबतच सीएनजी मोडमध्ये हे इंजिन 88 hp पावर आणि 121.5 NM पीक टॉर्क जनरेट करते. नियो ड्राईव्ह टेक्नॉलॉजी आणि E-CNG टेक्नॉलॉजी यामुळे या कारला उत्तम फ्युल एफिसीएंसी मिळते. टोयोटा रुमीयन MPV ला पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 20.51kmpl मायलेज आणि सीएनजी व्हेरिएंट मध्ये 26.11kmpl मायलेज मिळते.
फीचर्स –
टोयोटा रुमीयन MPV या कारमध्ये (Toyota Rumion MPV) देण्यात आलेल्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ड्युअल फ्रंट आणि फ्रंट सीट साईड एअरबॅग, ब्रेक असिस्ट, इंजन इमोबिलायझर, इबीडी सह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम सह हिल होल्ड असिस्ट, सर्व सीटांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर, हाय स्पीड अलर्ट सिस्टीम, ऑटो कोलायझन नोटिफिकेशन, विकल हेल्थ मॉनिटर, मालफंक्शन इंडिकेटर अलर्ट, यासारखे बरेच सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे.
कनेक्टिव्हिटी फीचर्स
टोयोटा रुमीयन MPV या कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी मध्ये इंजन रिमोट स्टार्ट स्टॉप, रिमोट इमोबिलायझेशन, टो अलर्ट यासारखे फीचर्स उपलब्ध आहेत. स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी मध्ये क्लायमेट कंट्रोल, फाइंड माय कार, लॉक अनलॉक यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे.