Isuzu D-Max S-Cab Z पिक-अप ट्रक भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । इसुजू मोटर्स इंडिया कंपनीकडून इसुझु डी मॅक्स हा पिकअप ट्रक 2002 मध्ये तयार करण्यात आला होता. आता नुकतीच इसुजू मोटर्स इंडियाने नवीन डी मॅक्स एस कॅब जेड वेरियंट मध्ये लॉन्च केला आहे. हा पिकप ट्रक महिंद्रा थार मारुती सुझुकी जिम्नी आणि फोर्स गुरखा यासारख्या ऑफरिंग गाड्यांसोबत प्रतिस्पर्धा करेल . या पिकअप ट्रकच्या टॉप वेरिएंट मध्ये कंपनीने पाच कलर ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी कोस्मिक ब्लॅक, गैलेना ग्रे, स्प्लैश व्हाईट, नोटीलस ब्लु, टाईटेनियम म्हणजेच सिल्वर हे कलर ऑप्शन्स कंपनीने दिले आहेत. या पिकअप ट्रकची किंमत 15 लाख रुपये एवढी आहे.

   

स्पेसिफिकेशन

Isuzu D Max S Cab Z pick Up Truck मध्ये 2.5 इसुजु 4JA1VSS टर्बो इंटरकोल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सह उपलब्ध असून हे इंजिन 3600 rpm वर 159 hp पावर आणि 1500- 2400 rpm वर 176 NM पीक टॉर्क जनरेट करते.

अन्य फीचर्स

Isuzu D Max S Cab Z pick Up Truck या वेरियंट मध्ये LED डीआरएल, फ्रंट फॉग लॅम्प, ईगल डिझाईन क्रोम ग्रील यासह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले आहे. यासोबतच या पिकअप ट्रक च्या लूक बद्दल बोलायचं झालं तर, क्रोम फिनिश डोअर, टेलगेट हॅण्डल, टर्न इंडिकेटर्स सह पावर ॲडजस्टेबल ओआरव्हीएम, स्पोर्टी रुफ रेल्स, 6 स्पोक व्हील ओव्हर आणि गन मेटल शार्क फिन अँटिना यासारखे अन्य फीचर्स देण्यात आले आहेत.

इंटरनल डिझाईन

Isuzu D Max S Cab Z pick Up Truck या पिकअप ट्रक मध्ये देण्यात आलेल्या केबिन बद्दल बोलायचं झालं तर, यात कीलेस एन्ट्री, स्टायलिश अँटी स्किड साईड स्टेप्स देण्यात आले आहे. या पिकअप ट्रकच्या आतमध्ये पियानो ब्लॅक फिनिशिंग ट्रिम एलिमेंट्स, माऊंटेड कंट्रोल, लेदर फिनिश स्टीयरिंग व्हील, ड्युअल टोन ब्लॅक, डार्क ग्रे प्रीमियम अपहोल्स्ट्री या सोबतच ऍडजेस्टेबल हेड रेस्ट देखील देण्यात आले आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Isuzu D Max S Cab Z pick Up Truck यामध्ये सहा स्पीकर, मल्टिपल यूएसबी पोर्ट, 7.0 इंच टच स्क्रीन ऑडिओ सिस्टीम, पार करण्यासाठी रियर पार्किंग कॅमेरा, यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे. एवढेच नाही तर सेंट्रल कन्सोल वर कप होल्डर, मॅप लॅप, सनग्लास होल्डर, आणि को ड्रायव्हर सन शेडच्या मागच्या साईडने व्हॅनिटी मिरर देण्यात आले आहे. त्याचबरोबर ड्रायव्हरसाठी विंडो मध्ये ऑटो अप डाऊन सिस्टीम देण्यात आली आहे. याशिवाय बाकी सर्व ठिकाणी पावर विंडो उपलब्ध आहे.