टाइम्स मराठी । आजकाल इलेक्ट्रिक वाहन (Electric Scooter) खरेदी करण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड कल दिसतो. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांचा लुक आणि डिझाईन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी आकर्षक लुक प्रदान करतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती बऱ्यापैकी जास्त असल्या तरीही काही इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपन्या कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिक वाहन आणत आहेत. अशातच कमी बजेटमधल्या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही अवघ्या 406 रुपयांमध्ये ही इलेक्ट्रिक स्कुटर घरी घेऊन जाऊ शकता. यासोबतच तुम्हाला लायसन्स आणि रजिस्ट्रेशन करण्याची देखील गरज पडणार नाही. तर जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटर बाबत .
आम्ही तुम्हाला ज्या इलेक्ट्रिक स्कुटर बद्दल सांगत आहोत तिचे नाव आहे Avon E Plus… Avon E Plus या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 25 हजार रुपये आहे. याशिवाय तुम्हाला इन्शुरन्स साठी वेगळे पैसे द्यावे लागतील. तुम्ही पाच हजार रुपये देऊन डाऊन पेमेंट वरही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला 20000 रुपयांचे लोन घेण्याची गरज पडते. जर तुम्ही हे लोन आठ टक्क्यांच्या इंटरेस्ट रेट वर पाच वर्षांसाठी घेत असाल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला 406 रुपये EMI वरून ही इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणू शकता.
50 KM पर्यंत रेंज –
या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 0.57 kwh बॅटरी पॅक देण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर 50 km पर्यंत रेंज देते. याशिवाय इलेक्ट्रिक स्कूटर ची टॉप स्पीड 24 kmph एवढी आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये देण्यात आलेली बॅटरी आठ तासांमध्ये फुल चार्ज होते. Avon E Plus या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 220 W मोटर देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी असल्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशनची गरज नाही.
Avon E Plus फीचर्स
Avon E Plus या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सिंगल सीट देण्यात आले आहे. यामुळे बसताना कम्फर्टेबल वाटू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटर च्या समोरील बाजूस फ्लॅट फूट रेस्ट, मागच्या साईडने बूट स्पेस बॉक्स देण्यात येतो. या बूट स्पेस बॉक्स मध्ये तुम्ही हेल्मेट सहजपणे ठेवू शकतात. म्हणजेच बूट स्पेस बॉक्स मध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खास म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये पेंडल देखील देण्यात आले आहे. म्हणजे जर तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी संपली तर तुम्ही सहजतेने पँडलच्या मदतीने स्कूटर चालवू शकता.