टाइम्स मराठी | ट्रॅव्हलर्स असो किंवा तरुण पिढी त्यांच्यामध्ये बुलेटबाबतची क्रेझ (New Royal Enfield Bullet 350) नेहमी दिसून येते. म्हणूनच आपल्याकडे शंभर पैकी चाळीस जणांकडे तरी नेमकी बुलेट असते. त्यामुळे बुलेटची हीच क्रेझ पाहून Royal Enfield ने नवीन Bullet 350 अपडेटेड फीचर्स सह लॉन्च केली आहे. या नवीन बुलेटमध्ये अनेक दमदार फीचर देण्यात आले आहेत. परंतु ही नवीन बुलेट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण कंपनीने या बुलेटची किंमत 1.74 लाख ठेवली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Bullet 350 विषयी सर्व माहिती.
3 variants
Royal Enfield दमदार Bullet 350 केली आहे. या बुलेटची तीन व्हेरिएंट आहेत. त्यातली पहिली मिलिटरी व्हेरिएंट असून तिचा रंग लाल आणि काळा आहे. दुसरी स्टँडर्ड व्हेरिएंट आहे जिचा रंग काळा-मरून आहे. आणि तिसरी ब्लॅक-गोल्ड कलर व्हेरिएंट आहे.. या बुलेटला एक आकर्षक हँडलबार आणि डिजिटल अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. त्यामुळे ती जास्त आकर्षित वाटत आहे.
Bullet 350 इंजिन – New Royal Enfield Bullet 350
Bullet 350 मध्ये क्रोम फिनिश इंजिन आणि मिरर, सोनेरी रंगाचा 3D बॅज, मागील बाजूस डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल एबीएस सिस्टम देण्यात आली आहे. तर याला सिंगल चॅनल ABS आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. सोबत 349 सीसी कूल्ड इंजिन दिले आहे. जे 20.2 bhp पॉवर आणि 27Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. तसेच याला सोनेरी रंगात 3D लोगो देण्यात आला आहे.
Bullet 350 Safety–
बुलेटचे स्पीड कंट्रोल करण्यासाठी 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ज्यामुळे स्पीड नियंत्रित करता येणे सोपे असेल. तसेच, या बुलेटला फ्रंट फोर्क्स आणि ट्विन गॅस चार्ज्ड रिअर शॉक देण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर, १००-सेक्शन फ्रंट टायर आणि १२०-सेक्शन रियर टायर ही आहेत.
Bullet 350 किंमत–
सध्या बाजारात Bullet 350 लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे तिची किंमत देखील तशीच आहे. Bullet 350 (मिलिटरी व्हेरिएंट) सुरुवातीला 1.74 लाखात उपलब्ध होईल. तर मिड-लेव्हल व्हेरिएंटची (स्टँडर्ड) 1.96 रुपयात मिळेल. आणि टॉप व्हेरिएंटची (ब्लॅक-गोल्ड) 2.16 लाखात मिळेल. तुम्ही Royal Enfield च्या शोरूममध्ये जाऊन Bullet 350 विषयी अधिक माहिती जाऊन घेऊ शकता.