टाइम्स मराठी । विवो कंपनीने Y सिरीज च्या दोन स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. यासोबतच कंपनीने डिस्काउंट कॅशबॅक ऑफर देखील ग्राहकांसाठी आणली आहे. विवो कंपनीचे हे दोन स्मार्टफोन म्हणजेच Vivo Y36 आणि Vivo Y02t. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर विवो कंपनीचे हे दोन स्मार्टफोन कमी किमतीमध्ये तुम्ही खरेदी करू शकतात. तर जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि नवीन किमती.
Vivo Y02t स्पेसिफिकेशन
Vivo Y02t या विवो कंपनीच्या स्मार्टफोन मध्ये 6.51 इंच IPS LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1600×720 पिक्सेल रिझोल्युशन सह येतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 44 W चा फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये क्वाल कॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर देण्यात आली आहे.
Vivo Y02t कॅमेरा आणि स्टोरेज
Vivo Y02t या स्मार्टफोन मध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 8MP सिंगल रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 4 GB RAM आणि 64 GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध आहे
Vivo Y36 स्पेसिफिकेशन
Vivo Y36 विवो कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.64 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2388×1080 पिक्सेल रिझोल्युशन सह उपलब्ध असून 90Hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 44 W चा फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये क्वाल कॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर देण्यात आले आहे. विवो कंपनीच्या या स्मार्टफोन मध्ये AG ग्लास बॉडी वापरण्यात आली आहे.
Vivo Y36 कॅमेरा आणि स्टोरेज
Vivo Y36 विवो कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर प्रायमरी कॅमेरा 50 MP आणि सेकंडरी कॅमेरा 2MP यासोबतच फ्रंट कॅमेरा 16 MP देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये दोन कलर ऑप्शन्स दिले असून सनसेट गोल्ड आणि कॉस्मिक ग्रे यामध्ये हा उपलब्ध आहे.
Vivo Y36 आणि Vivo Y02t दोन्ही स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर
विवो कंपनीच्या Vivo Y36 या स्मार्टफोनच्या 8GB Ram आणि 128 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 16,999 रुपये एवढी आहे. परंतु विवो कंपनीने या स्मार्टफोनची किंमत एक हजार रुपयांनी कमी केली आहे. म्हणजेच तुम्हाला हा स्मार्टफोन 15,999 मध्ये मिळू शकतो. तर दुसरीकडे Vivo Y02t या स्मार्टफोनच्या 4GB Ram आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंट ची किंमत 9,999 रुपये आहे. परंतु विवो कंपनीने दिलेल्या ऑफरनुसार या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. त्यानुसार हा स्मार्टफोन 9,499 रुपयांमध्ये ग्राहक खरेदी करू शकतात.
Vivo Y36 आणि Vivo Y02t बँक डिस्काउंट ऑफर
एवढेच नाही तर विवो कंपनीने Vivo Y36 या स्मार्टफोनवर हजार रुपये डिस्काउंट देखील दिला आहे. ही 1000 रुपये डिस्काउंट ऑफर आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँक,आयडीएफसी फर्स्ट बँक, फेडरल बँक, येस बँक, बँक ऑफ बडोदा, Induslnd बँक या बँकेच्या कार्ड वरून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास मिळणार आहे. या ऑफरचा फायदा फ्लिपकार्ट आणि विवो रिटेल स्टोअर्स वर मिळू शकतो.