टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी सॅमसंगने आपला Samsung Galaxy A54 5G नव्या कलर व्हेरियेण्टमध्ये लाँच केला आहे. कंपनीने यापूर्वी देखील samsung Galaxy A54 हा स्मार्टफोन 3 कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला होता. आता नवीन कलर ऑप्शन मध्ये samsung Galaxy A54 स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोन मध्ये पूर्वीच्या स्मार्टफोनमध्ये असलेले फीचर्स देण्यात येणार आहे. यापूर्वी भारतात सॅमसंग ने ऑसम लाईट, ऑसम वॉलेट आणि ऑसम ग्रेफाइड या कलर ऑप्शन Galaxy A54 5G लॉन्च केला होता. आता कंपनीने ऑसम व्हाईट कलर मध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात.
स्पेसिफिकेशन–
Samsung Galaxy A54 5G यामध्ये 6.6 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेट सह येतो. या स्मार्टफोनसोबत डिस्प्ले च्या वर कॉर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. या मोबाईल मध्ये samsung Exynos 1380 चीप सेट देण्यात आले आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एवढेच नाही तर हा स्मार्टफोन IP67 रेटिंग सह उपलब्ध असून यामुळे स्मार्टफोन डस्ट आणि वॉटर रेसिडेंट फ्री राहतो.
कॅमेरा आणि स्टोरेज– Samsung Galaxy A54 5G
New samsung Galaxy A54 या स्मार्टफोन मध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर , यामध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12 MP चा सेकंडरी कॅमेरा आणि 5 MP चा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये डेप्थ सेन्सर आणि एलईडी फ्लॅश देखील देण्यात आले आहे. Galaxy A54 मध्ये 8GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
कनेक्टिव्हिटी फीचर्स–
Samsung Galaxy A54 5G मध्ये देण्यात आलेल्या कनेक्टिव्हिटी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, 5G सपोर्ट, स्टिरिओ स्पीकर, USB टाईप सी पोर्ट, wifi, ब्लूटूथ यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 38,999 रुपयात उपलब्ध आहे.