आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट; रोषणाईसारखा अद्भुत नजारा पहाच (Video)

टाइम्स मराठी | पावसाळा सुरू झाला की लाईट जाणं आणि विजा पडणं हे सत्र कायम सुरू होते. पण तुम्ही एक साथ असंख्य विजा पडल्याचं भयानक दृश्य बघितलं का? सोशल मीडियावर वायरल झालेला एका व्हिडिओमध्ये भयानक दृश्य बघायला मिळालं. या व्हिडिओमध्ये 50 मिनिटात 100 वीजा एकसाथ पडत असल्याचं दिसत आहे. विचार करा, जर 50 मिनिटात 100 विजा पडतील तर 30 सेकंदात एक वीज पडत असेल.

   

तुर्की येथील मुदन्या या शहरात 16 जूनला वातावरण खराब झाले होते त्यावेळी हे भयानक दृश्य बघायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून खगोल छायाचित्रकार उगर इकीजलर यांनी हे दृश्य त्यांच्या कॅमेरा टिपले. त्याचबरोबर त्यांनी या संपूर्ण घटनेचा टाईम लॅप्स बनवला आणि या घटनेचे फोटो सोशल मीडियावर टाकले.

ही घटना घडली त्या दिवशी रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी खगोल छायाचित्रकार उगर इकीजलर यांनी त्यांचा कॅमेरा ते राहत असलेल्या घराच्या टेरेस वर ठेवून टाईम लॅप्स मोड ऑन केला. आणि 50 मिनिटात 100 विजा पडणारे दृश्य कॅमेरात कैद झाले. या घटनेवर ते म्हणतात की, मी प्रत्येक पडणाऱ्या विजेला बघितलं. ती दृश्य सुंदर होते. जेव्हा सर्व फोटोज एका फ्रेम मध्ये टाकले त्यावेळी तर अदभूत दृश्य बघायला मिळालं. आणि मी घाबरलो. असं दृश्य मी आतापर्यंत कधीच बघितलेलं नव्हतं. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पडणारी वीज 3 प्रकारे दिसते. त्यातील पहिली म्हणजे ढगांच्या मध्ये, दुसरी दगांमधून जमिनीवर येताना आणि तिसरी म्हणजे विज पाण्यात पडताना दिसते.

वीज का पडते?

2022 च्या अभ्यासानुसार, तुम्हाला माहिती आहे का? जगात प्रत्येक वर्षी सुमारे 140 कोटी वेळा म्हणजे दररोज 30 लाख वेळा वीज पडत असते. 100 दशलक्ष ते हजार दशलक्ष व्होल्टचा व्होल्टेज प्रत्येक वीज मध्ये असतो. त्यामुळे हवेचे तापमान 10 हजार डिग्री सेल्सिअस ते 22 हजार डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढू शकते. अशाप्रकारे ढग आणि जमिन या दोघांमध्ये अत्यंत वेगवान प्रवाहकीय ऑक्सिजनचे कण मिळतात. त्यामुळे वीज जमिनीवर पडते.