टाइम्स मराठी । आजकाल आधार कार्ड (Aadhaar Card) प्रत्येक कामासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आपण बऱ्याचदा आधार कार्ड आपलं ओळखपत्र म्हणून दाखवतो. काही सरकारी योजना, बँक केवायसी, ऍडमिशन, या सर्व गोष्टींसाठी आधार कार्डची गरज असते. त्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? काही काळानंतर आधार कार्ड एक्सपायर होते म्हणजे आधार कार्डची व्हॅलिडीटी डेट संपते. त्यावेळी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षापेक्षा जुने असेल तर सरकारने आता तुमच्यासाठी खास योजना सुरू केली आहे. जेणेकरून तुम्ही तुमचे आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करू शकतात.
आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करणे याबाबत सरकारकडून प्रत्येक वेळेस सूचना जारी केल्या जातात. तरीही बरेच जण आधार कार्ड अपडेट करत नाही. आणि नंतर कोणत्याही कामाला त्यांना अडचण येते. सरकारकडून दहा वर्षापेक्षा जुन्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली होती. आणि या तारखेपर्यंत आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्यात येणार असल्याचे देखील सांगितलं होतं. परंतु अजूनही बऱ्याच जणांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट केले नाही. त्यामुळे आता सरकारने पुन्हा तारीख वाढवून दिली आहे. आता ही तारीख तीन महिने वाढवून 14 डिसेंबर पर्यंत करण्यात आली आहे. जेणेकरून अजून राहिलेले काही नागरिक आधारकार्ड अपडेट करतील.
तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुमच्या जवळच्या जन सुविधा केंद्रात जावे लागेल. किंवा तुम्ही http://myadhaar.udai.gov.in/ या पोर्टल वर जाऊन देखील 14 डिसेंबर पर्यंत फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करू शकतात. UIDAI ने दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेल्या नागरिकांनी देखील आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन दिले आहे. लोकसंख्येची अचूक माहिती मिळावी आणि ओळखपत्राचा पुरावा रहिवासीचा पुरावा अपलोड करणे गरजेचे आहे असं प्राधिकरणाने सांगितलं.
जर तुम्हाला आधार कार्ड फ्री मध्ये अपलोड करायचा असेल तर या पद्धतीने तुम्हाला अपलोड करता येईल.
1) सर्वात अगोदर http://myadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटवर जा.
2) वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
3) लॉगिन केल्यानंतर अपडेट नाव, लिंग, जन्म आणि पत्ता निवडा.
4) त्यानंतर अपडेट आधार ऑनलाईन वर क्लिक करा
5) डेमोग्राफिक ऑप्शन एड्रेस च्या लिस्ट मधून पत्ता निवडा. आणि आधार अपडेट करण्यासाठी पुढे जा या बटणावर क्लिक करा.
6) स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि आवश्यक आकडेवारी भरा.
7) त्यानंतर सेवा विनंती क्रमांक जनरेट होईल.
8) आधार अपडेट साठी हा नंबर महत्त्वाचा असतो तो जपून ठेवा.
9) अपलोड केलेल्या माहितीचे तपासणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एसएमएस येईल.
त्याचबरोबर आधार नोंदणी अपडेटची स्थिती बीबीसी कार्डची सिरीज जाणून घेण्यासाठी किंवा एसएमएस द्वारे माहिती मिळवण्यासाठी तुम्ही UIDAI चा टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करू शकता.