आता FasTag नेही करता येणार पेट्रोल-डिझेलचे ऑनलाईन पेमेंट, कंपनीने आणली ‘ही’ खास सुविधा

TIMES MARATHI | आज-काल ऑनलाईन पद्धतीने सर्वत्र बिल पे केले जाते. यूपीआय फोन पे, गुगल पे यासारख्या ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण पेमेंट करत असतो. आता या प्लॅटफॉर्ममध्ये आणखीन एका प्लॅटफॉर्मचा समावेश करण्यात आला आहे. आता पेट्रोल किंवा डिझेल भरल्यानंतर यूपीआय गुगल पे यावरून पेमेंट न करता फास्टँगच्या माध्यमातून पेमेंट करता येऊ शकते. एवढेच नाही तर टोलसाठी देखील खास ऑप्शन सुरू करण्यात आले आहे.

   

काय आहे फास्टटॅग सुविधा

फास्टँग ही एक भारताची इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शन सिस्टीम आहे. ही सिस्टीम नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून ऑपरेट करण्यात येते. रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून तुमच्या गाडीचा टोल प्रीपेड किंवा पोस्टपेड अकाउंटवरून कट केल्या जाईल. त्यासाठी तुम्हाला फोन पे किंवा कॅश पेमेंट करावे लागणार नाही. आणि पेट्रोल डिझेल भरताना देखील कॅश किंवा ऑनलाईन पेमेंट देण्याची गरज भासणार नाही. हे पेमेंट फास्ट्रॅगच्या माध्यमातून करता येईल.

पे बाय कार

आता अमेझॉन आणि मास्टर कार्डच्या टोनटॅगचा देखील फास्टटॅगसाठी वापर करण्यात येऊ शकतो. नुकताच कंपनीने हे नवीन प्लॅटफॉर्म पेमेंटसाठी लॉन्च केले आहे. त्यासाठी कारच्या इन्फोटेनमेंट सिस्टीमला यूपीआय सोबत जोडून पे बाय कार सर्विसचा वापर करता येऊ शकतो. या सिस्टीमच्या माध्यमातून कारचालक त्याच्या स्मार्टफोनचा वापर करून फ्युल आणि फास्टट्रॅकच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकतात. ही सुविधा लॉन्च करणारी कंपनी टोनटॅगने या सर्विसची सुरुवात एनजी हेक्टर आणि भारत पेट्रोलियमच्या जॉईंट व्हेंचरमध्ये लॉन्च केली आहे.

अशा पद्धतीने काम करते पे बाय कार सर्विस

जेव्हा पेट्रोल पंपावर फ्युल भरण्यासाठी कार चालक जातो. तेव्हा फुल डिस्पेन्सर नंबर त्या कारच्या इन्फोटेनमेंट सिस्टीमवर दिसतो. एवढेच नाही तर साउंड बॉक्स पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देखील दिल्या जाते. आणि जेव्हा फ्युल कारमध्ये टाकल्या जाते तेव्हा साउंड बॉक्सच्या माध्यमातून अमाऊंटची माहिती देखील दिल्या जाते. त्यानंतर ग्राहक ट्रांजेक्शनच्या प्रोसेसला पूर्ण करू शकतात. या पे बाय कार सर्विसच्या माध्यमातून फास्टट्रॅकला रिचार्ज करण्यासाठी देखील मदत होते. आणि रिचार्ज झाल्यानंतर अमाऊंट इम्पॉर्टंट स्किनवर दिसू शकते.

फास्टटॅगच्या माध्यमातून टोल भरणे सोपे

फोर व्हीलरसाठी संपूर्ण भारतात फास्टट्रॅग बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या महामार्गावर टोल आहेत त्या ठिकाणी या फास्टट्रॅक चा वापर केला जातो. हे फास्ट टॅग एका प्रकारे प्रीपेड पोस्टपेड रिचार्ज कार्ड प्रमाणे आहे. फोर व्हीलरच्या विंड शील्डवर चुंबकीय पट्टी सक्षम स्टिकर म्हणून चिटकवले जाते. आणि ही चुंबकीय पट्टी रेडिओ फ्रिक्वेन्सी टेक्नॉलॉजी किंवा RFID या सह जोडले जाते. जेणेकरून टोल नाक्यावर हे स्टिकर स्कॅन केल्यास ऑनलाइन किंवा कॅश पेमेंट करण्याची गरज भासणार नाही. स्टिकरच्या माध्यमातून टोल नाक्यावर स्कॅन केल्यास आपोआप पेमेंट होईल. कार ओनरच्या खात्यातून पेमेंट कापून घेतले जाईल. हायवेवर टोल भरण्यासाठी ही इलेक्ट्रॉनिक पद्धत सुरू करण्यात आली आहे. म्हणजे आता टोल नाक्यावर थांबून पेमेंट करणे ही सुविधा पूर्णपणे बंद होईल.