Honda ने SUV मध्ये लॉन्च केल्या 4 नविन व्हेरिएंट; ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर उपलब्ध

TIMES MARATHI | होंडा कंपनीने नवीन SUV लॉन्च करत सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. होंडा कंपनीच्या या नवीन एसयूव्हीचे नाव HONDA ELEVATE आहे. होंडा कंपनीच्या कार्स भारतीय बाजारामध्ये प्रचंड डिमांडमध्ये असतात. त्यानुसार नवीन लॉन्च करण्यात आलेल्या होंडा एलिवेटची लॉन्चिंग पूर्वीपासून बंपर बुकिंग सुरू आहे. त्याचबरोबर या होंडा एलिवेटच्या वेटिंग पीरियडमध्ये देखील सहा महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. होंडाने लॉन्च केलेल्या व्हेरिएंटवर ग्राहकांसाठी खास ऑफर देणायत आल्या आहेत. या ऑफरची माहिती कंपनीने आपल्या वेबसाइटवर दिली आहे.

   

किमत

HONDA ELEVATE या एसयूव्हीमध्ये 4 चार वेगवेगळे व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये ट्रिम लेव्हल वर SV, V, VX, आणि ZX हे चार व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहे. या एसयूव्हीच्या बेस वेरीएंटची सुरुवाती किंमत 11 लाख रुपयांपासून पुढे आहे. तसेच पेट्रोल सीबीटी कॉम्बोसह टॉप वेरिएंट ZX याची किंमत 16 लाख रुपये एवढी आहे. HONDA ELEVATE च्या SV आणि V या दोन व्हेरीएंटची तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या या एसयूव्हीच्या टॉप व्हेरिएंट ZX ला जास्त डिमांड असून या एसयूव्हीसाठी ग्राहकांना सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचबरोबर VX यावेळी साठी देखील सहा महिने प्रतीक्षा करावी लागेल.

फिचर्स

HONDA ELEVATE मॅन्युअल 15.31 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 16.02 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. या एसयूव्हीसोबत व्हेंटिलेटर आणि मसाजिंग सीट यासारखे ॲक्सेसरीज देखील उपलब्ध करण्यात आले आहे. नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या HONDA ELEVATE SUV ही हुंडाई क्रेटा, कीआ सेलट्रॉस फेसलिफ्ट, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रूजर हायराइडर, स्कोडा कुशाक, वॉक्सवॅगन ताइगुन, एमजी एस्टोर आणि अपकमिंग सिट्रोएन C 3 एअर क्रॉस या कार सोबत प्रतिस्पर्धा करते.