Samsung Galaxy Ring ची किंमत झाली लीक, PPG, ECG सेन्सरसह ‘हे’ असतील भन्नाट फिचर्स

TIMES MARATHI | आज-काल टेक्नॉलॉजी एवढी बदलत चालली आहे की कधी कोणत्या डिव्हाईसचा शोध लागेल सांगता येत नाही. या जगात आपण संपूर्ण डिव्हायसेसने घेरलेले आहोत. दैनंदिन जीवनात आपण स्मार्टफोन सारखा डिवाइस, वॉच, असे बरेच डिवाइसेस आपल्या सोबत घेऊन वावरत असतो. आता सॅमसंग कंपनी आणखीन एक नवीन डिवाइस लॉन्च करणार आहे. हे डिवाइस म्हणजे Samsung Galaxy Ring असणार आहे. म्हणजेच या स्मार्ट रिंग डिवाइसला सेन्सर लावण्यात येणार आहे.

   

Galaxy Ring Features

या सॅमसंग गॅलेक्सी रिंगची माहिती आणि फीचर्स काही महिन्यांपूर्वी लिक झाले होते. त्यानुसार या स्मार्ट रिंगमध्ये PPG आणि ECG हे सेन्सर वापर येणार आहे. एवढेच नाही तर, स्मार्ट वॉच आणि हार्ट रेट मॉनिटरिंग सेन्सर देखील यामध्ये मिळू शकतो. ही स्मार्ट रिंग जानेवारी महिन्यामध्ये Galaxy S24 सिरीजसह लॉन्च करण्यात येऊ शकते. या लॉन्चिंगसाठी सॅमसंगकडून स्पेशल इव्हेंट घेण्यात येणार आहे. आणि या इव्हेंटमध्ये ही स्मार्ट रिंग हायलाईट करण्यात येईल.

Ring Price

Samsung Galaxy Ring याबाबतचे बरेच फीचर्स ऑनलाईन लीक झाले आहे. या लीकनुसार यामध्ये पीपीजी आणि इसीजी सेन्सर देण्यात येऊ शकतात. त्याचबरोबर रिंगमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग फीचर्स, व्हॉइस कंट्रोल यासारखे फीचर्स देखील यामध्ये उपलब्ध करण्यात येऊ शकतात. या स्मार्ट रिंगच्या माध्यमातून परफेक्टली स्क्रीनला टच होऊन हार्ट रेट समजू शकतील. Samsung Galaxy Ring या डिवाइसच्या फाईड ट्रेडमार्क एप्लीकेशन मध्ये Samsung Curio हे नाव वापरण्यात आले आहे. त्यानुसार या स्मार्ट रिंगचे नाव Samsung Curio असण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या माहितीनुसार या स्मार्टरिंगची किंमत 299 डॉलर म्हणजेच 25000 रुपये एवढी असू शकते. ही स्मार्टरिंग यावर्षी किंवा 2024 मध्ये जानेवारी महिन्यात लॉन्च करण्यात येऊ शकते.