6 Airbags Not Mandatory : कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य नाही; गडकरींची मोठी घोषणा

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये येणाऱ्या अपकमिंग कारमध्ये सहा एअर बॅग अनिवार्य करण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठे विधान केले आहे. यापूर्वी कारची सुरक्षितता लक्षात घेऊन गडकरी यांनी सांगितलं होतं की १ ऑक्टोंबर पासून आगामी सर्व कारमध्ये सहा एअरबॅग देणे अनिवार्य करण्यात येईल. परंतु आता गडकरींनी एका असं म्हंटल आहे कि, कार्समध्ये 6 एअर बॅग (6 Airbags Not Mandatory)असणे बंधनकारक नाही. सीएनबीसीच्या एका रिपोर्टनुसार, नितीन गडकरी यांनी सांगितलं की भारतामध्ये कार सिक्युरिटी पुनरावलोकनासाठी नियम सध्याच्या परिस्थितीसाठी अनुकूल नसून 6 एअर बॅग असणे हा नियम प्रत्येक कारला उपयोगी पडणार नाही .

   

यापूर्वीही सरकारने पुढे ढकलला होता नियम- 6 Airbags Not Mandatory

यापूर्वी देखील सहा एअरबॅग कारमध्ये बंधनकारक करण्यासाठी गडकरी यांनी विधान दिले होते. परंतु त्या विधानानंतर आणखीन एक वर्षाचा कालावधी गेला परंतु हा नियम लागू करण्यात आला नाही. यावर केंद्रीय मंत्री यांनी सांगितलं की, यापूर्वी जागतिक पुरवठा साखळीतील समस्यांमुळे सरकारने हा नियम काही काळासाठी पुढे ढकलला होता. परंतु आता ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला पुरवठा साखळीची मोठी समस्या अजूनही उद्भवत आहे. यानुसार आता ग्लोबल इकॉनोमिक परिस्थिती पाहता प्रत्येक कारला सहा एअर बॅग बंधनकारक करण्यात येणार नाही.

हा नियम सर्व कार्सला लागून असला तरीही काही कारसाठी मात्र सहा एअर बॅग लागू करण्यात आले आहेत. 8 सीटर कारसाठी सहा एअर बॅगचा नियम लागू होतो. म्हणजेच एमपीव्ही आणि एसयूव्ही कारमध्ये सहा एअरबॅग बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य नसल्याचे (6 Airbags Not Mandatory)गडकरी यांनी स्पष्ट केल्याने वाहन निर्माता कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.