टाइम्स मराठी । भारतात मोबाईलचे दिवाने काय कमी नाहीत. अनेकजण सातत्याने नवनवीन मोबाईल घेण्याकडे आपला कल दाखवतात. त्यामुळे मार्केट मध्येही एकापेक्षा एक जबरदस्त आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असे मोबाईल लाँच होत असतात. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Poco ने आपला Poco M6 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा मोबाइल वेगवेगळ्या स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किमतही स्टोरेज नुसार वेगवेगळी आहे. आज आपण Poco च्या या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात.
स्पेसिफिकेशन– Poco M6 Pro 5G
Poco M6 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये देण्यात आलेल्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6.79 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेटसह येत आहे. तसेच यामध्ये तुम्हाला240 hz टच सँपलिंग रेट देखील मिळत आहे. हा स्मार्टफोन गोरीला ग्लास 3 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आले आहे.
कॅमेरा–
Poco M6 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा , २ मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा, आणि समोरील बाजूला ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6 GB + 128 GB स्टोरेज, 4 GB + 128GB स्टोरेज आणि 4 GB + 64 GB स्टोरेज अशा व्हेरिएन्ट मध्ये हा मोबाईल उपलब्ध आहे. Poco M6 Pro 5G मध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध असून ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कलर ऑप्शन आणि सिक्युरिटी फीचर्स–
Poco M6 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये सिक्युरिटी साठी फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. एवढेच नाही तर या स्मार्टफोन ला डस्ट आणि स्प्लैश रजिस्टेंससाठी IP53 रेटिंग देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन फॉरेस्ट ग्रीन आणि कस्टमर ब्लॅक या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
किंमत किती ?
Poco M6 Pro 5G या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 एवढी आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरीएन्ट ची किंमत 10,999 एवढी आहे. आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरीएंट ची किंमत 12,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन आज पासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे.