टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी Xiaomi लवकरच Xiaomi 14 सिरीज लॉन्च करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कंपनी स्मार्टफोन लॉन्च करू शकते. या सिरीज मध्ये Xiaomi 14 आणि Xiaomi 14 pro हे दोन्ही स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतात. जाणून घेऊया या स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन आणि डिटेल्स याबाबत अगदी सविस्तरपणे …
Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.73 इंचचा कर्व एमोलेड डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले हाय रिजॉल्युशन आणि 120 hz रिफ्रेश रेट प्रदान करेल. यासोबतच दोन्ही स्मार्टफोनमध्ये ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणारा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट वापरण्यात येणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन एंड्रॉयड 14 आधारित एमआईयूआई 15 वर बेस्ड असल्याचं सांगण्यात येत आहे.
Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro दोन्ही स्मार्टफोन मध्ये देण्यात येणाऱ्या कॅमेरा बद्दल मात्र कोणतीच माहिती उपलब्ध नसून यामध्ये 12 GB रैम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध होऊ शकते. Xiaomi 14 स्मार्टफोन मध्ये 4860mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. ही बॅटरी 90 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. आणि Xiaomi 14 Pro मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात येऊ शकते. ही बॅटरी 120 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल .
Xiaomi 14 आणि Xiaomi 14 pro दोन्ही स्मार्टफोन मध्ये ड्युअल सिम 5g, ब्लूटूथ, वायफाय, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, यासारखे ऑप्शन उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन नोव्हेंबर मध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या दोन्ही मोबाईलच्या किमतींबद्दल अजून खुलासा करण्यात आला नाही.