टाइम्स मराठी । तुम्हीही नवीन ईयर बड्स (Earbuds) घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. प्रसिद्ध कंपनी Boult ने 3 नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत. यामध्ये Y1 Pro, W50 आणि W20 हे तीन इयर बड्सचा समावेश आहे. या न्यू जनरेशन इयर बड्स मध्ये तुम्हाला नवीन डिझाईन आणि परिपूर्ण फीचर्स मिळतील. कंपनीने नवीन इयर बड्स लॉन्च करत किमतीमध्ये देखील बदल केला आहे. त्यानुसार हे तिन्ही मॉडेलच्या किमती फक्त 899 रुपयांपासून सुरू होतात.
किमती पहा –
Boult W50 हे इयर बड्स ॲश ब्लॅक, ब्ल्यू लस्टर, सिल्वर सॅंड आणि रुबी ब्रॉन्ज या चार कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 999 रुपये आहे. तर बोल्ट W20 हे इयर बड्स सुद्धा परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध असून हे इयर बड्स फक्त 899 मध्ये खरेदी करू शकतात. यामध्ये कंपनीने स्पेस ब्लॅक, पाइनग्रीन, ग्लेशियर ब्लू असे तीन कलर ऑप्शन दिले आहेत. तर Boult Y1 Pro या इयर बड्स मध्ये तीन कलर ऑप्शन उपलब्ध आहे. यामध्ये ब्लॅक, रेड आणि ब्ल्यू या रंगाचा समावेश आहे. हे तीनही कलर ऑप्शन मेटलिक फिनिशिंगसह उपलब्ध आहे. या इयर बड्स ची किंमत 1099 रुपये एवढी आहे.
Boult Y1 Pro या इयर बड्स मध्ये ब्लिंक आणि पेयर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे युजर्स आरामात स्मार्टफोन कनेक्ट करू शकतात. या सोबतच जेन क्वाड माइक ENC ही टेक्नॉलॉजी देखील यामध्ये उपलब्ध आहे. या टेक्नॉलॉजीमुळे नॉईज कॅन्सलेशन आणि कॉल कॉलिटी सुधारण्यास मदत मिळते. एवढेच नाही तर यात टच कंट्रोल व्हॉइस असिस्टंट सपोर्ट IPX5 वॉटर रेजिस्टन्स हे फीचर्स उपलब्ध आहे. या इयर बड्स मध्ये उपलब्ध असलेल्या बॅटरीची लाईफ 60 तास एवढी असल्याचे कंपनीने सांगितलं आहे. हे इयर बड्स 10 मिनिट चार्ज केल्यानंतर 120 मिनिटांपर्यंत प्लेबॅक टाइम देते.
Boult W50 या इयर बड्स मध्ये जेन क्वाड माईक ENC टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. या टेक्नॉलॉजी मुळे क्रिस्टल क्लियर व्हॉईस क्वालिटी मिळते. यासोबतच बूम एक्स टेक्नॉलॉजीने देखील हे इयर बड्स सुसज्ज आहेत. या इयर बड्स मध्ये उपलब्ध असलेली बॅटरी 50 तासापर्यंत प्लेबॅक टाईम देते. कंपनीने या इयर बड्स सोबत 45 MS अल्ट्रा लो लेटेन्सी चा दावा केला आहे. याशिवाय या बोल्ट कंपनीच्या इयर बड्समध्ये ब्लिंक एंड पेयर टेक्नॉलॉजी , ब्लूटूथ 5.3, टच कंट्रोल, वॉइस असिस्टंट इंटिग्रेशन, IPX5 वॉटर रजिस्टन्स टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे.
Boult W20 या इयर बड्समध्ये कॉम्बेड गेमिंग मोड देखील उपलब्ध करण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने बुम एक्स टेक्नॉलॉजी सह 13 mm ड्रायव्हर, हाय बास, ऑडिओ कॉलिटी यासारखे फीचर्स उपलब्ध करून दिले आहे. या इयर बड्स मध्ये कॉलिंग साठी ZEN ENC माईक उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये ब्लूटूथ 5.3, टच कंट्रोल, IPX5 वॉटर रजिस्टन्स, ब्लिंग अँड पेयर टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. हे इयर बड्स एकदा चार्ज केल्यावर 32 तासांपर्यंत प्ले टाईम आणि 120 तासापर्यंत स्टँड बाय टाइम देऊ शकतात.