महिंद्राने लाँच केली Bolero Neo+ Ambulance; पहा फीचर्स आणि किंमत

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातीलआघाडीची कंपनी आहे. महिंद्राने आत्तापर्यंत एकापेक्षा एक जबरदस्त मॉडेल्स ग्राहकांसाठी आणल्याचे आपण बघितलं आहे. यापूर्वी महिंद्राने पॉप्युलर SUV Bolero नियो ही एसयूव्ही 2021 मध्ये लॉन्च केली होती. त्यानंतर आता कंपनीने बोलेरो नियो नवीन अवतारामध्ये लॉन्च केली आहे. या एसयूव्हीचे नाव महिंद्रा Bolero Neo+ Ambulanc असं असून कंपनीने ही एसयूव्ही टाईप बी सेगमेंट मध्ये लॉन्च केली आहे. आज आपण या गाडीचे खास फीचर्स आणि तिच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन

Bolero Neo+ Ambulance मध्ये जास्त पावरफुल 2.2 L mHawk इंजन देण्यात आले आहे. हे इंजन 120 BHP पावर आणि 280 NM पीक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर हे इंजिन रियल व्हील ड्राईव्ह सेटअप मध्ये सहा स्पीड ट्रान्समिशन गिअर बॉक्ससोबत जोडण्यात आले आहे. कंपनीने या ॲम्बुलन्स मॉडेलमध्ये हाय पावर असणारे स्टील बॉडी शेल आणि जेन 3 चेसिस दिले आहेत. बोलेरो नियो ॲम्बुलन्स मध्ये मोठे व्हिल बेस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ही ॲम्बुलन्स शहरांसोबतच ग्रामीण भागामध्ये मध्ये जरी खराब रस्ते असले तरी आरामात धावू शकते.

फीचर

Bolero Neo+ Ambulance मध्ये एखाद्या पेशंटचे ऑपरेशन करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार स्ट्रेचर सिस्टीम, ऑक्सिजन सिलेंडर, क्लिनिंग साठी वॉश बेसिंग असेंबली, इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये पब्लिक ऍड्रेस सिस्टीम यामध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर केबिनमध्ये बसण्यासाठी ड्रायव्हर प्लस 4 सीट सुविधा उपलब्ध आहे. या ॲम्बुलन्सच्या बॉडी ऑन फ्रेम कन्स्ट्रक्शनवर जास्त भर देण्यात आला आहे.

या ॲम्बुलन्स मॉडेलच्या लॉन्चिंग वेळी कंपनीने सांगितले की, आम्ही राष्ट्रहितासाठी दिलेल्या वचनाप्रमाणे काम करत आहोत. जनतेपासून पोलीस, लष्कर इतर दलांपर्यंत ते अग्निशमन विभाग, वनीकरण, सिंचन या सगळ्या कामांमध्ये देखील आम्ही सेवा देत आहोत. त्यानुसार आम्ही लॉन्च केलेले नवीन ॲम्बुलन्स मॉडेल प्रचंड क्षमतेने सेवा सुरू ठेवेल.

किंमत किती?

Bolero Neo+ Ambulance ची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये एवढी आहे. आणि सरकारी ईमार्केट प्लेस GeM साठी या ॲम्बुलन्सची किंमत 12.31 लाख रुपये एवढी आहे. ही बोलेरो नियो ऍम्ब्युलन्स AIS च्या सर्व नियमांचे पालन करत बनवण्यात आली आहे. ही ॲम्बुलन्स वेगवेगळ्या मार्केट प्लेस मध्ये ॲम्बुलन्स ऑपरेटर यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे.