जगातील सर्वांत स्वस्त फ्लिप स्मार्टफोन लाँच!! जाणून घ्या किंमत अन् भन्नाट फीचर्स

TIMES MARATHI| स्मार्टफोन ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे बाजारात अनेक नवनवीन प्रकारचे स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत. आता नुकताच भारतामध्ये Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असून तो व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन आपल्याला फक्त 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत आहे. त्यामुळे हा फोन इतर फ्लिप फोन्सना किंमतीच्या बाबतीत चांगलीच टक्कर देऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या फोनचे फीचर्स आणि किंमत.

   

किंमत

Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोनची 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजमध्ये फक्त 49,999 रुपये इतकी किंमत आहे. हा स्मार्टफोन दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. जो आयकॉनिक ब्लॅक आणि मिस्टिक डॉन कलरमध्ये विकत घेता येऊ शकतो. येत्या 1 ऑक्टोबरला दुपारी बारा वाजेपर्यंत Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोन ॲमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होत आहे. या फोनला इतर देशांमध्ये देखील लवकरच लॉन्च करण्यात येईल.

फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये अनेक खास नवीन फीचर्स आहेत. नवीन Tecno Phantom V Flip 5G मध्ये कंपनीने बाहेरील बाजूस 1.32 इंचाचा AMOLED कव्हर डिस्प्ले दिला आहे. जो 466×466 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. याशिवाय, फोन उघडल्यावर 6.9-इंचाचा फुल HD+ लवचिक LTPO AMOLED डिस्प्ले प्रदान केला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 20.5:9 आस्पेक्ट रेशो व्यतिरिक्त 1080×2460 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. फोनच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर्स आणि पॉवर बटण दिलेले आहेत आणि पॉवर बटणमध्ये इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध आहेत.

कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये मागील पॅनलवर 64MP आणि 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर्ससह कॅमेरा सिस्टम आहे. याशिवाय फोल्डेबल डिस्प्लेमधील पंच-होलमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. कंपनीने प्राथमिक सेटअपमध्ये 64MP RGBW अल्ट्रा-सेन्सिटिव्ह प्राइमरी सेन्सर प्रदान केला आहे. ज्याद्वारे उच्च दर्जाचे फोटो क्लिक केले जाऊ शकतात. फ्रीकॅम प्रणालीमुळे आपल्याला कोणत्याही अँगलमध्ये फोटो काढता येऊ शकतो.

बॅटरी

Tecno Phantom V Flip 5G मध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह MediaTek Dimensity 8050 प्रोसेसर आहे. या डिवाइसमध्ये 4000mAh क्षमतेच्या बॅटरीला 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगनंतर फोनची बॅटरी 33 टक्के होते. अशा अनेक कारणांसाठी हा फोन ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतो.