Chanakya Niti : या व्यक्तींच्या घरी जेवण करणं म्हणजे घोर अपराध; पहा काय सांगते चाणक्यनीती?

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीति (Chanakya Niti) प्रचंड प्रसिद्ध आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रहापैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. चाणक्यनीतीमध्ये दिलेल्या नितीचे पालन केल्यास आपल्याला जीवनात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर जीवन कसे जगावे? कोणत्या व्यक्तींपासून लांब राहणे गरजेचे आहे, कोणत्या गोष्टी इतरांसोबत शेअर करू नये? केल्यास होणारे परिणाम या सर्वांबद्दल आपण चाणक्यानीतीत वाचत असतो. त्यानुसार ते आचरणात आणणे देखील गरजेचे आहे. आचार्य चाणक्यानुसार, जीवनामध्ये असे काही व्यक्ती आहेत त्यांच्या घरी कधीच जेवणाचा आस्वाद घेऊ नये. या व्यक्ती नेमक्या कोणत्या आहेत हे आज आप्पन जाणून घेणार आहोत.

   

१) चोर आणि गुन्हेगाराच्या घरी कधीच करू नका भोजन

आचार्य चाणक्यानुसार कधीच चोर किंवा गुन्हेगार यांच्या घरात भोजन करणे टाळले पाहिजे. कारण चुकीच्या पद्धतीने पैसे कमवून भोजनासाठी सामग्री आणली जाते. त्यामुळे भोजन नकारात्मक प्रभाव प्रदान करतो. त्यामुळे कधीच अशा लोकांच्या घरी भोजन करू नये.

२) किन्नरांच्या घरी करू नका भोजन– (Chanakya Niti)

बऱ्याचदा रस्त्यावर किंवा मंदिराजवळ आपल्याला बरेच किन्नर दिसतात. हे किन्नर आपल्याकडे पैशांची मांग करतात. किन्नरांना पैसे देणे हे शुभ मानले जाते. किन्नरांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. आचार्य चाणक्य यांच्यानुसार किन्नरांना पैसे देणे योग्य आहे परंतु त्यांच्या घरी भोजन करणे किंवा कोणतीही गोष्ट खाणे अशुभ मानले जाते. त्यामुळे चुकूनही किन्नरांच्या घरी भोजन किंवा कोणतीच गोष्ट खाऊ नये.

३) रागीट आणि क्रोध असलेल्या व्यक्तींच्या घरी करू नका भोजन

या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे लोक आहेत. काही व्यक्ती प्रेम दयाळू असतात तर काही रागीट क्रोध दर्शवणारे असतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार (Chanakya Niti) क्रोध करणाऱ्या व्यक्तींच्या घरी देखील कधीच भोजन करू नका. कारण ज्या व्यक्तींमध्ये जास्त क्रोध आहे त्यांच्या घरातील वातावरण नकारात्मक होते. आणि त्याचा परिणाम भोजनावर देखील होतो. त्यामुळे कधीच क्रोध करणाऱ्या रागीट व्यक्तींच्या घरी जेवण करणे टाळले पाहिजे.

४) अस्वच्छता असलेल्या ठिकाणी करू नये भोजन

आपण एखाद्या व्यक्तीच्या घरी भोजन करण्यासाठी गेल्यास घरामध्ये जर सर्वत्र घाणीघाण दिसत असेल आणि व्यवस्थितपणे साफसफाई केलेली नसेल तर अशा ठिकाणी कधीच भोजन करू नये. अशा ठिकाणी भोजन केल्यामुळे तुम्ही आजारी पडू शकतात. आणि साफ स्वच्छता नसलेल्या ठिकाणी भोजन करणे अयोग्य आहे.