टाइम्स मराठी । भारतातील ग्रेटर नोएडा या ठिकाणी पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेल्या फेमस टू व्हीलर स्पोर्टिंग रेस Moto GP या कार्यक्रमासाठी Honda कंपनीने MotoGP स्टाइलमध्ये 2 गाड्या लाँच केल्या आहेत. यामध्ये एक स्कुटर आणि एका बाईकचा समावेश आहे. Hornet 2.0 आणि Dio125 असं या दोन्ही गाड्यांची नावे असून रेप्सॉल लुक मध्ये त्या लाँच करण्यात आल्या आहेत. तसेच या दोन्ही गाड्या बाजारात विक्रीसाठी खुली करण्यात आल्या आहेत.
भारतामध्ये पहिल्यांदा हा इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान उत्तर प्रदेश येथील ग्रेटर नोएडा मध्ये बुद्ध इंटरनॅशनल सर्किट या ठिकाणी आयोजित केला आहे. . या इव्हेंट मध्ये देशातील वेगवेगळ्या भागातील रेसर , रेसिंग लव्हर सहभागी होतील. यासाठी कंपनीने होर्नेट आणि डियो दोन्ही वाहनांचा लुक चेंज केला आहे.
Dio लूक –
होंडा कंपनीने Dio 125 रेप्सॉल एडिशनमध्ये नवीन कलर कॉम्बिनेशन उपलब्ध केले आहेत. यामध्ये रॉस वाईटसह होंडा ट्रॅडिशनल ऑरेंज कलर कम्बाईन मध्ये दिसू शकेल. यासोबतच एलईडी हेड लॅम्पला स्लिक करून फ्रंट पोझिशनमध्ये देण्यात आले आहे. आणि ड्युअल डीप मफलर ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. डीओच्या अलॉय व्हीलला ऑरेंज कलर देण्यात आला असून स्कूटर मध्ये सर्व ग्राफिकल बदल करण्यात आले आहे. यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील कंपनीने दिले आहे.
Hornet चा लूक
होंडा कंपनी होर्नेटमध्ये पांढऱ्या आणि नारंगी कलर कॉम्बिनेशन ग्राफिक्स दिले आहेत. यासोबतच बॉडी पॅनल आणि अलोयवर रेप्सॉल रेसिंग स्ट्राइप्स लावण्यात आली आहे. ही बाईक पूर्णपणे वाईट आणि ऑरेंज कॉम्बिनेशनमध्ये डिझाईन करण्यात आली आहे. यावेळी या दोन्ही वाहनांच्या इंजिन मध्ये कोणतेच बदल करण्यात आलेले नसून फक्त कलर कॉम्बिनेशन आणि ग्राफिक्स मध्ये बदल करण्यात आले आहे.
किंमत किती –
होंडा कंपनीने होर्नेट 2.0 ची किंमत 1.40 लाख रुपये एवढी ठेवली आहे. आणि डीयो 125 ची किंमत 92,300 रुपये एवढी आहे. या दोन्ही गाड्या ऑनलाइन पद्धतीने देखील खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी होंडा कंपनीच्या अधिकारीक वेबसाईटवर जाऊन बुकिंग करावे लागेल