Chanakya Niti To Become Rich : आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. हे प्राचीन भारतीय राजनीति शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रह पैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. नीतीशास्त्र आपल्या सर्वांच्या ओळखीतील संग्रह आहे. नीतीशास्त्रामध्ये दिलेल्या नितीचे पालन केल्यास आपल्याला जीवनात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला सर्वानाच श्रीमंत व्हावस वाटत. पैशाची गरज ही प्रत्येकालाच असते, परंतु श्रीमंत होण्यासाठी नेमकं काय करावं? तसेच काय करू नये याबाबत आचार्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केलं आहे. चाणक्यनीतीनुसार, (Chanakya Niti To Become Rich) श्रीमंत होण्यासाठी आपल्या अंगातील कोणत्या वाईट सवयी सोडल्या पाहिजेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.
१) संपत्तीची हाव करू नका –
आचार्य चाणक्य म्हणतात की, संपत्ती मिळवण्यासाठी लालची भावना तुम्हाला पैशापासून वंचित करू शकते. तुम्ही मेहनतीच्या बळावर पैसे कमवू शकतात. पण तुम्ही दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा टाकत असाल तर ते अयोग्य आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पुण्य करत नसाल तर तुमची परिस्थिती बिघडू शकते. त्याचबरोबर तुम्ही वायफळ खर्च करत असाल तर तुमची ही सवय तुम्हाला गरीब बनवू शकते. त्यामुळे आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या खर्चाचे नियोजन करून, तुमच्या गरजा ओळखून, खर्च कमी करू शकता तरच तुम्ही श्रीमंत व्हाल.
२) अस्वच्छ राहणे बंद करा– Chanakya Niti To Become Rich
आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनात असे काही व्यक्ती आहेत ज्यांना स्वच्छ -निरोगी राहणे आवडत नाही. ते अत्यंत घाणेरडे जीवन जगतात. जे लोक स्वच्छ आणि निरोगी राहत नाही. ते व्यक्ती सतत आजारी पडतात. त्याचबरोबर जे लोक स्वच्छ राहत नाही चांगले वस्त्र घालत नाही त्यांच्या आजूबाजूला अस्वच्छ वातावरण निर्माण होते. हे लोक प्रत्येक वेळेस दारिद्र्यात जीवन जगतात. त्यामुळे त्यांनी या सवयी सोडून दिला पाहिजे आणि स्वच्छ राहणीमान ठेवले पाहिजे.
३) कडवट बोलणे टाळा –
काही लोक प्रचंड किरकिर करतात आणि कडवट बोलतात. त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे कडू बोलण्याची सवय लवकरच बदलली पाहिजे. कडू बोलण्यामुळे समोरच्या व्यक्ती सोबतचे आपले संबंध खराब होऊ शकतात आणि लोक कंगाल पण होऊ शकतात.
४) सूर्यास्तानंतर झोपु नका –
काही व्यक्तींना संध्याकाळी सूर्यास्तानंतर झोपण्याची सवय असते. ही अत्यंत वाईट सवय असून अशामुळे व्यक्ती गरीब होतो. ही अत्यंत वाईट सवय आणि अशुभ असून यामुळे घरात दारिद्र्य येते. यामुळे घरात कधीही माता लक्ष्मी येत नाही आणि प्रसन्न होत नाही. म्हणून कधीच चुकून देखील सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये.