Kia Sonet Facelift येणार नव्या बदलांसह; काय खास मिळणार?

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये किआ इंडिया नवीन कार लॉन्च करण्याची तयारी आहे. या कारचे नाव SONET SUV असं आहे. ही कार फेसलिफ्टेड व्हर्जन मध्ये असून सध्या भारतीय रस्त्यांवर या कारची टेस्टिंग सुरू आहे. या नवीन व्हर्जन मध्ये कंपनीकडून बरेच बदल करण्यात येणार असून नवीन लुक आणि डिझाईन मध्ये ही कार आपल्याला दिसू शकते.

   

Kia Sonet facelift मध्ये ADAS फीचर्स कंपनी देऊ शकते. या एसयूव्ही च्या इंटरियर मध्ये बरेच बदल करण्यात आले असून नवीन फीचर्स देखील उपलब्ध करण्यात आले आहे. या नव्या SUV मध्ये कंपनीकडून डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डॅशकॅम दिले जाऊ शकते. तसेच यामध्ये व्हेंटिलेटर फ्रंट सीट,वायरलेस चार्जिंग, सिंगल पेन सनरुफ, ऑटोमॅटिक एलईडी हेडलॅम्प, अँड्रॉइड ऑटो, एप्पल कार प्ले, 8.0 इंच टच स्क्रीन, क्रूज कंट्रोल, रियर एसी वेंट यासह ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.

Kia Sonet facelift या एसयूव्हीच्या टिझरमध्ये डियर टोन अलोय व्हीलचा नवीन सेट, शार्क फिन अँटिना, हाय माउंटेड स्टॉप लॅप दिसून आले. त्याचबरोबर या टीझरमध्ये एसयूव्हीच्या मागच्या साईडने एलईडी इन्सर्ट सह नवीन एलईडी टेल लॅम्प असल्याचे देखील निदर्शनास आले. त्यानुसार ही एसयूव्ही किआच्या सेन्ट्रोस फेसलिफ्ट प्रमाणे दिसत आहे.

इंजिन –

Kia Sonet facelift मध्ये 1.2 लिटर NA पेट्रोल इंजिन, 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजन, आणि 1.5 लिटर डिझेल इंजन देण्यात येऊ शकते. याबद्दल अजूनही खुलासा करण्यात आलेला नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये ही एसयूव्ही लॉन्च झाल्यानंतर Tata nexon, Maruti Suzuki Fronx, Maruti Suzuki brezza, Renault kicker, Mahindra XUV 300 या गाडयांना जोरदार टक्कर देईल.