Hero Passion Pro 125 येणार नव्या अवतारात; मिळतील हे खास फीचर्स

टाइम्स मराठी । Hero कंपनीच्या बाईक्सला भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्याचबरोबर कंपनी वाहनांमध्ये सतत वेगवेगळे अपडेट्स लॉन्च करत असते. आताही कंपनी सर्वात जास्त विकली गेलेली Passion Pro 125 पुन्हा नवीन अपडेट सह लॉन्च करू शकते. मार्केटमध्ये रोज नवनवीन गाड्या येत असल्याने मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलेली आहे. त्याचमुळे हिरो आपली पॅशन प्रो नव्या अवतारात लाँच करून बाकी कंपन्याला फाईट देईल. आज आपण या अपकमिंग पॅशन प्रो मध्ये उपलब्ध असलेल्या स्पेसिफिकेशन आणि फिचर्सबद्दल जाणून घेणार आहोत.

   

इंजन

आगामी Hero passion pro 125 मध्ये 125cc इंजन उपलब्ध करण्यात येणार आहे. हे इंजन पाच स्पीड गिअर बॉक्सला जोडलं जाईल आणि 10.5 पीएस पावर जनरेट करेल. कंपनी या बाईक मध्ये 9 लिटर फ्युएल टॅंक देखील देऊ शकते. गाडीच्या मायलेजबद्दल सांगायचं झाल्यास एक लिटर पेट्रोल मध्ये ही बाईक 55 ते 65 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम असेल.

Hero passion pro 125 या बाईक मध्ये कंपनीकडून डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ऑडोमीटर, डिजिटल ट्रिपमीटर, डिजिटल टेकोमीटर, ABS सिस्टीम, फ्युल गेज, USB मोबाईल चार्जर, स्टॅन्ड इंडिकेटर यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीकडून ही बाईक 94 हजार रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

Hero passion pro 125 ही बाईक पुन्हा एकदा लाँच करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कारण भारतीय बाजारामध्ये आज काल कम्युटर बाईक आणि इलेक्ट्रिक बाइक्स यांची मोठ्या प्रमाणात चलती आहे. त्याचबरोबर भारतीय बाजारामध्ये इलेक्ट्रिक बाइक्स मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रतिस्पर्धा देखील वाढत आहे. ऑटोमोबाईल निर्माता कंपन्यांकडून त्यांच्या वाहनांमध्ये वेगवेगळे ऍडव्हान्स फीचर्स, उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे हिरो कंपनीने देखील पॅशन प्रो 125 ही बाईक पुन्हा नवीन फीचर्स, मायलेज, आणि नव्या किमतीमध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.