टाइम्स मराठी | बॉलीवूड हॉलीवुड चित्रपटांमध्ये आपण बऱ्याचदा मानवासारखे दिसणारे रोबोट पाहत असतो. अशाच प्रकारचा रोबोट आता अरबपती बिझनेस मॅन एलन मस्क यांची कंपनी टेस्लाने बनवला आहे. टेस्लाने रविवारी या मानवासारखे काम करत असलेल्या रोबोटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ह्युमनोईड रोबोट ऑप्टिमस नमस्ते पोझ सह दिसत आहे.
टेस्ला कंपनीने बनवलेला हा रोबोट वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करू शकतो. त्याचबरोबर योगासन देखील हा रोबोट करताना दिसत आहे. यावेळी इलोन मस्क यांनी आणखीन एका पोस्टमध्ये चार रोबोट दाखवले असून हे चारही टेसला कंपनीचे असल्याचे सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करण्यात आले आहे.
ट्विटर हँडल वर सक्रिय असलेल्या भारतीय युजर्सने नमस्ते म्हणणाऱ्या या रोबोटला मोठ्या प्रमाणात लाईक केलं आहे, रोबोटने दिलेली पोझ भरतनाट्यम आहे भारताकडूनही नमस्ते असे रिप्लाय केले आहे. एवढेच नाही तर हा AI रोबोट योगा मशीन, हॅलो आणि हाऊ आर यू हे आऊटडेटेड झाले असून नमस्ते चा ट्रेंड आला आहे असं देखील एका युजरने कमेंट करून सांगितलं.
हे ऑप्टिमस ह्युमेनॉईड रोबोट वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतात. त्याचबरोबर हे रोबोट स्वतःच्या पायांची हालचाल करतात. तसेच हे रोबोट मानव करत असलेली कामे देखील अतिशय चांगल्या स्पीडने करू शकतात . एलन मस्क यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा रोबोट आपल्याला एका टेबलवर पडलेले वेगवेगळ्या कलरचे ब्लॉक वेगवेगळ्या ट्रेमध्ये कलर प्रमाणे वेगळे करताना दिसतो. आणि यामध्ये मानवाने अडथळा जरी निर्माण केला तरीही देखील रोबोट आपले काम थांबवत नाही. तो त्याचे काम करत राहतो.