Vastu Tips: घरामध्ये ‘या’ गोष्टी ठेवल्यास होऊ शकतो नकारात्मक परिणाम

TIMES MARATHI | घरातील वातावरण समृद्ध ठेवण्यामध्ये आणि त्या घरातील लोकांच्या आयुष्यात सुख येण्यामागे वास्तुशास्त्राची महत्त्वाची भूमिका असते. वास्तुशास्त्रानुसार ठेवण्यात आलेली प्रत्येक वस्तू स्वतःच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. या ऊर्जेचा परिणाम घरातील प्रत्येक लोकांवर होतो. अनेक वेळा घर बांधताना वास्तुशास्त्र न तपासल्यामुळे पुढे जाऊन त्याचे दोष घरातील लोकांना भोगावे लागतात. काहीवेळा तर घरामध्ये चुकीच्या वस्तू ठेवण्यात आल्यामुळे देखील वास्तुच्या दोषाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळेच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की घरामध्ये कोणत्या वस्तू ठेवण्यात येऊ नयेत.

   

या वस्तू घरात कधीच ठेवू नये

1) आपल्या घरामध्ये तुटलेली काच किंवा आरसा कधीही अधिक काळ ठेवू नये. जर खिडकीची काच देखील तुटलेली असेल तर ती काच देखील बदलून टाकावी. फुटलेल्या काचा घरात नकारात्मक ऊर्जा तयार करतात

2) घरामध्ये असलेल्या देवघरात जर देवी-देवतांची फाटलेली आणि जुने चित्रे असतील तर ती तशी ठेवू नका. किंवा घरामध्ये तुटलेली मूर्ती देखील असल्यास तिचे देखील विसर्जन करा. घरामध्ये जर एका कबुतराने घरटे बनवले असेल तर ते देखील तेथून काढून टाका. अशा गोष्टींमुळे घरातील लोकांच्या आयुष्यात आर्थिक बाधा येऊ शकतात.

3) घरामध्ये जर फाटलेली कपडे तुटलेल्या चपला अशा गोष्टी असतील तर त्याची देखील लवकर विल्हेवाट लावावी. अशा गोष्टींमुळे घरातील लोकांना आर्थिक परीस्थितीचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे घरात चिडचिड वाढून मतभेद तयार होऊ शकतात.

4) घरामध्ये जर महाभारताचे चित्र, असेल किंवा नटराजाची मूर्ती, ताजमहाल, काटेरी झाडे, कारंजे, जंगली प्राण्यांचे चित्र अशा गोष्टी असतील तर त्याचा नकारात्मक परिणाम घरातील वातावरणावर पडू शकतो. त्यामुळे सहसा अशा गोष्टी घरात ठेवू नयेत.

5) त्याचबरोबर घरातील घड्याळ बंद पडले असेल किंवा खराब झाले असेल तर ते लवकर दुरुस्त करून आणावे. या कारणामुळे घरातील कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. खराब चार्जर, केबल्स, बल्ब अशा प्रकारच्या विजेच्या बंद पडलेल्या गोष्टी देखील घरात ठेवू नयेत.

6) घरामध्ये कधीही काटेरी किंवा दूध देणारी झाडे लावू नयेत. तसेच , घरातमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी कोणतीच गोष्ट ठेवण्यात येऊ नये या सर्व गोष्टींचा परिणाम घरातील वातावरणावर पडू शकतो.