Honda Activa Limited Edition लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Honda Activa Limited Edition । ऑटोमोबाईल निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणारी होंडा देशभरात प्रसिद्ध आहे. होंडा कंपनीचे वाहन खरेदी करण्यात ग्राहकांचा मोठा कल दिसून येतो. कंपनी सुद्धा सातत्याने नवनवीन गाड्या बाजारात आणून ग्राहकांना खुश करत असते. आताही होंडाने आपली प्रसिद्ध गाडी ऍक्टिव्हाचे नवीन लिमिटेड एडिशन मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने या गाडीचे बुकिंग सुद्धा सुरु केलं आहे. आज आपण होंडाच्या या स्कुटरचे खास फीचर्स आणि तिच्या किमतींबाबत जाणून घेऊयात.

   

किंमत किती?

होंडा कंपनी लाँच केलेले नवीन लिमिटेड एडिशन मॉडेल २ व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये DLX आणि स्मार्ट हे दोन व्हेरियंट आहेत. हे दोन्ही व्हेरियंट भारतामध्ये सर्व होंडा रेड विंग डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. एक्टिवाच्या DLX ची किंमत 80,734 एवढी आहे तर स्मार्ट व्हेरीएंटची किंमत 82,734 एवढी आहे.

Honda Activa Limited Edition मध्ये थ्रीडी प्रीमियम ब्लॅक क्रोम गार्निश आणि मागील ग्रॅब रेल मध्ये बॉडी कलर डार्क फिनिश मध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या नवीन ऍक्टिवा मध्ये काही बदल केले आहेत. ही नवीन एक्टिवा अप्रतिम डार्क कलर रंगाच्या थीम मध्ये आणि ब्लॅक क्रोम एलिमेंट्स आणि बॉडी पॅनल्स वर नवीन पट्ट्यांमध्ये उपलब्ध आहे. ही नवीन होंडा एक्टिवा लिमिटेड एडिशन नेट स्टील ब्लॅक मेटॉलिक आणि पर्ल सायरन ब्ल्यू या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

इंजिन – Honda Activa Limited Edition

Honda Activa Limited Edition मध्ये 109.51cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन BSVI OBD 2, कंप्लायंट PGM-FI सह उपलब्ध आहे. हे इंजिन 7.64 BHP पावर आणि 8.9 NM पिक टॉर्क जनरेट करते. होंडा कंपनीकडून या स्कूटर वर दहा वर्षांपर्यंत वॉरंटी देण्यात येत आहे. यामध्ये तीन वर्षापर्यंत स्टॅंडर्ड वॉरंटी आणि सात वर्षांसाठी ऑप्शनल एक्सटेंड देण्यात येणार आहे.

होंडा आणि स्कूटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अध्यक्ष, सीईओ त्सुत्सुम ओटानी यांनी सांगितलं की, भारतीय टू व्हीलर सेगमेंट मध्ये एक्टिवाने क्रांती केली आहे. मागच्या दोन दशकांमध्ये ग्राहक एक्टिवावर प्रचंड खुश आहेत. एक्टिवा हे सर्वात बेस्ट आणि पसंतीस उतरणारी स्कूटर असून एक्टिवाच्या नवीन लिमिटेड एडिशनला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे.