Chanakya Niti : आई- वडिलांनी मुलांसमोर कधीच करू नये ‘या’ गोष्टी; पहा काय म्हणतात आचार्य चाणक्य

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांचं लिखाण आणि संग्रह मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या संग्रहा पैकी एक म्हणजे चाणक्य नीति. चाणक्य नीति (Chanakya Niti) आपल्या जीवनामध्ये प्रचंड उपयोगी पडते. आचार्य चाणक्य यांनी लिखाण केलेल्या चाणक्य नीतिचा फायदा प्रत्येक वयोगटातील मुलांना, व्यक्तींना, वृद्धांना होत असतो. निती नियमांचे पालन करून कोणतीही व्यक्ती गरिबीतून श्रीमंतीत येऊ शकतो. आणि यश मिळवू शकतो. आचार्य चाणक्य यांनी माता पिता साठी काही खास नीती सांगितल्या आहे.

   

आचार्य चाणक्य नीति नुसार, पेराल ते उगवेल. यानुसार तुम्ही कुटुंबात ज्या प्रकारे व्यवहार कराल त्याच प्रकारे तुमची मुलं शिकतील. आणि त्या प्रकारेच वागतील. परिवारात मुलं त्यांच्या आई वडिलांपासून काही गोष्टी शिकत असतात. बऱ्याच गोष्टी लहान मुलं आई-वडिलांना पाहून शिकतात. त्यामुळे आई-वडिलांनी अशा पद्धतीने वागले पाहिजे जेणेकरून त्याचा चांगला प्रभाव मुलांवर पडेल. ज्यामुळे मुलं संस्कारी होतील आणि प्रत्येकाचा सन्मान करतील. चाणक्यनीती नुसार, काही गोष्टी अशा आहेत ज्या पालकांनी मुलांसमोर करू नयेत. अन्यथा कुटुंब पूर्णपणे नष्ट होऊ शकते चला तर आज आपण त्याबाबत जाणून घेऊयात.

१) अपशब्द वापरू नये– Chanakya Niti

आचार्य चाणक्य यांच्या मते, माता पिता यांनी कधीच अपशब्द वापरू नये. याचा पूर्णपणे परिणाम मुलांवर दिसून येतो. आणि मुलंही अपशब्द वापरायला लागतात. आणि इतरांसोबत दुव्यवहार करतात. ज्यामुळे मुलांवर देखील वाईट संस्कार होत असतात. म्हणून कधीही आई वडिलांनी मुलांसमोर अपशब्द वापरू नये.

२) मुलांसमोर भांडण करू नये

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्यानुसार , आई-वडिलांनी कधीच मुलांसमोर भांडण करू नये. कारण यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. आणि मुलं संस्कारहीन बनतात. आई-वडिलांचा व्यवहार वागणूक बघूनच लहान मुलं मोठी होत असतात. लहान मुलांसमोर सतत भांडण केल्यामुळे मोठे होऊन देखील त्यांच्यावर तेच संस्कार होतात. आणि ते माता-पितांचा अपमान केल्याशिवाय राहत नाही.