टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. त्यात आता आता व्हाट्सअप मध्ये आणखीन एक फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहे. ज्यामुळे तुमचे चॅटिंग एक्सपिरीयन्स मध्ये बदल होईल. आणि Whatsapp वापरणे आणखी मजेशीर होईल. चला तर जाणून घेऊया नेमकं हे फीचर्स आहे तरी काय?
जाणून घ्या काय असेल फीचर
Wabetainfo ने शेअर केलेल्या माहितीनुसार, युजर्स चॅट करत असताना त्यांना फोटो व्हिडिओ आणि GIF ओपन करत असताना रिप्लाय देण्यासाठी नवं फीचर देण्यात येणार आहे. या फीचर वर काम सुरू असून काही बीटा टेस्टर्ससाठी हे फीचर उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या व्हाट्सअप मध्ये चॅट करत असताना फोटो व्हिडिओ GIF ओपन केल्यावर रिप्लाय ऑप्शन येत नाही. परंतु आपण या फोटो व्हिडिओ किंवा GIF वर क्लिक करून रिएक्शन शेअर करू शकतो. यामध्ये रिप्लाय ऑप्शन उपलब्ध करण्यात आलेला नाही. परंतु लवकरच आता फोटो व्हिडिओ ओपन केल्यानंतर रिप्लायचा ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे.
या रिप्लाय फीचर्स सोबतच कंपनी वेगवेगळ्या नवीन अपकमिंग फीचर वर देखील काम करत आहे. व्हाट्सअप मध्ये आपल्याला दिसत असलेले टेक्स्ट स्वरूपातील स्टेटस आपल्याला 24 तासांपेक्षा जास्त वेळपर्यंत दिसणार आहे. यासाठी वेळ सिलेक्ट करण्याचे देखील ऑप्शन कंपनीकडून देण्यात येणार आहे.