टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या कॉम्पॅक्ट SUV मॉडेलची जास्त चलती आहे. कॉम्पॅक्ट SUV कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये टाटा नेक्सन या एसयूव्हीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यानंतर मारुती ब्रेझा या एसयूव्हीने नेक्सनची जागा घेत मोठ्या प्रमाणात विक्री केली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर Hyundai मोटारने Hyundai Exter भारतात लाँच केली आहे. ही SUV पेट्रोल मोड आणि CNG मोड अशा 2 व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आली आहे. आज आपण या गाडीचे खास फीचर्स जाणून घेऊयात.
इंजन आणि मायलेज– Hyundai Exter
Hyundai Exter या एसयूव्ही मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजन सह सीएनजी व्हेरियंट देखील देण्यात आले आहे. यातील पेट्रोल इंजिन मध्ये उपलब्ध असलेली SUV 26 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. आणि CNG मध्ये उपलब्ध असलेली SUV 32 किलोमीटर प्रति किलो एवढे मायलेज देते. ह्युंदाई एक्स्टर ही नवीन लॉन्च करण्यात आलेली एसयूव्ही Fronx या SUV ला जोरदार टक्कर देईल. कारण Fronx पेट्रोल इंजनचे मायलेज हे 24 ते 25 किलोमीटर प्रति लिटर एवढे आहे. आणि CNG चे मायलेज 30 किलोमीटर प्रति लिटर एवढे आहे. म्हणजेच ह्युंदाई एक्स्टर fronx पेक्षा जास्त मायलेज देते.
फिचर्स काय?
Hyundai Exter मध्ये सेफ्टी साठी 6 एअर बॅग आणि स्टॅंडर्ड फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच यामध्ये TPMS फीचर्स देखील देण्यात आले आहे.TPMS म्हणजे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम. TPMS च्या माध्यमातून टायर मध्ये उपलब्ध असलेल्या एअर प्रेशरची माहिती मिळते. Fronx या SUV मध्ये 2 एअर बॅग देण्यात आलेल्या असून या SUV चा टॉप व्हेरिएंट मध्ये 6 एअरबॅग उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या एसयूव्हीमध्ये TPMS सिस्टीम देण्यात आलेली नाही.
याशिवाय Hyundai Exter मध्ये 8 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. ही अत्यंत ऍडव्हान्स सिस्टीम असून Fronx मध्ये सात इंचची इम्पोर्टेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. Hundai Exter मध्ये सहा स्पीकर देण्यात आले असून Fronx मध्ये चार स्पीकर उपलब्ध आहेत. Hundai Exter या नवीन एसयूव्ही ची किंमत 8 लाख रुपये पेक्षा कमी असल्याचं सांगण्यात येत आहे.