टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक वाहनांची मोठी चलती पाहता मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट कडे वळत आहेत. त्याचबरोबर या कंपन्या नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन सह इलेक्ट्रिक वाहन डेव्हलप करत आहेत. अशातच चिनी ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाणारी बिल्ड युअर ड्रीम्स BYD या कंपनीने थायलंडमध्ये नवीन इलेक्ट्रिक सेडान कार सील (Electric Sedan Car Seal) लॉन्च केली आहे. आज आपण इलेक्ट्रिक कारचे स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आलेली ही इलेक्ट्रिक सेडान कार तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यापैकी डायनामिक वेरियंटमध्ये 61.4 KWH ब्लड बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल इलेक्ट्रिक मोटरसह सुसज्ज असून यामध्ये 204hp मोटर उपलब्ध आहेत. ही मोटर या कारच्या फ्रंट व्हीलला पावर देण्याचे काम करते. आणि हे डायनामिक व्हेरिएंट 510 किलोमीटर पर्यंत रेंज प्रदान करते.
मिड स्पेस व्हेरीएंट आणि AWD व्हेरिएंट स्पेसिफिकेशन
BYD सील सेडान कारच्या मिड स्पेस व्हेरीएंट आणि AWD व्हेरिएंट मध्ये 82.5 kwh बॅटरी बसवण्यात ली आहे. यासोबतच या दोन्ही व्हेरिएंटला दोन मोटर सोबत जोडण्यात आले आहे. या दोन्ही कारच्या रेंज बद्दल सांगायचं झाल्यास मिड स्पेस व्हेरीएंट कार 650 किलोमीटर पर्यत धावते तर AWD व्हेरिएंट 580 किलोमीटर रेंज देते. BYD सील सेडान या कारची किंमत 29.8 लाख रुपये एवढी आहे.
या कार सोबत करते प्रतिस्पर्धा
BYD सील ही कार लवकरच भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. BYD सील सेडान चे 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑटो एक्सपो मध्ये अनावरण करण्यात आले होते. या कारमध्ये ओसीयन बार वर आधारित डिझाईन देण्यात आली आहे. मार्केट मध्ये BYD सील सेडान ही कार MG ZS EV आणि Hyundai Kona Electric या दोन्ही कारला थेट टक्कर देईल.