टाइम्स मराठी । ग्लोबल मार्केटमध्ये होंडा कंपनी नवीन स्टायलिश व्हॅन (Honda N-Van) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही व्हॅन इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये असणार असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर तब्बल 210 किलोमीटर पर्यंत रेंज देईल. एवढंच नव्हे तर गरज पडल्यास तुमच्या घराला वीजपुरवठा करू शकते आणि घरातील पंखे, बल्ब वगैरेही तुम्ही चालवू शकाल. आज आपण या इलेक्ट्रिक व्हॅनचे खास फीचर्स जाणून घेऊयात.
Honda N-Van असं या गाडीचे नाव आहे. होंडाच्या या इलेक्ट्रिक व्हॅनची लांबी 3395 mm एवढी असून रुंदी 1475 mm आणि उंची 1950 mm एवढी आहे. ही होंडा कंपनीची पाच डोर व्हॅन असून यामध्ये 2520 mm व्हीलबेस देण्यात येऊ शकतो. या इलेक्ट्रिक व्हॅनचे वजन 350 kg इतकं असू शकते.
बॅटरी– Honda N-Van
Honda N-Van मध्ये 1500 W बॅटरी बसवण्यात येईल. ही बॅटरी एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 210 किलोमीटर पर्यंत चालते. या व्हॅन मध्ये सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. तसेच जमिनीपासून ते स्टोरेज फ्लोअर बोर्ड पर्यंत 525 mm स्पेस उपलब्ध असेल. खास गोष्ट म्हणजे होंडाच्या या व्हॅन मध्ये देण्यात आलेल्या मोठ्या व्हील्समुळे गाडीला अप्रतिम लुक मिळतोय. होंडा इलेक्ट्रिक व्हॅनमध्ये 1,500 वॅट्सचे पॉवर आउटपुट असेल आणि यामध्ये देण्यात आलेल्या बाहेरील बाजूच्या पोर्टद्वारे विद्युत उपकरणे प्लग इन केली जाऊ शकतात. आणि तुम्ही घरातील पंखे, बल्ब वगैरेही चालवू शकाल
किंमत किती असेल?
मीडिया रिपोर्टनुसार या Honda N-Van चा प्रोटोटाइप 28 ऑक्टोंबरला जपान मध्ये होणाऱ्या मोबिलिटी शोमध्ये दाखवण्यात येणार आहे. ही व्हॅन 8.31 लाख रुपये एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे. या व्हॅनमध्ये 6 कलर ऑप्शन उपलब्ध असून Econ मोडमध्ये व्हॅन विजेचे बिल कमी करण्यासाठी मदत करते.