टाइम्स मराठी । आज-काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर प्रत्येक जण मोठ्या प्रमाणात करत आहे. यामध्ये आपण Whatsapp, Facebook, Instagram यासारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात युजर्स ऍक्टिव्ह असतात. हे प्लॅटफॉर्म बऱ्याच जणांसाठी पैसे कमवण्याचे साधन देखील बनले आहे. परंतु आता याच सोशल मीडियाचा वापर करणं आपल्या खिशाला चाप लावणार आहे. कारण मेटाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम चा यूजरसाठी नवीन योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून युजर्सला प्लॅटफॉर्मसाठी दर महिन्याला 1665 रुपये भरावे लागतील. त्यामुळे नेटकऱ्यांच्या पोटात चांगलाच गोळा आला आहे. मेटा कंपनीने दिलेल्या या निर्णयामुळे इंस्टाग्राम फेसबुक हे प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या युजर्सला आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पैसे कमवत असलेल्या युजर्सला मोठा धक्काच बसला आहे.
इंस्टाग्राम आणि फेसबुक ने जारी केलेल्या नवीन सबस्क्रीप्शन प्लॅन च्या माध्यमातून युजर्स ला जाहिरात मुक्त अनुभव देण्यात येणार आहे. यामुळे तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुक वापरत असताना ऍडव्हर्टाईसमेंट तुमच्या एंटरटेनमेंट मध्ये अडथळे आणणार नाही. तुम्ही सबस्क्रिप्शन प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्या जाहिराती किंवा त्रासदायक पोस्ट दिसणार नाहीत.
सबस्क्रीप्शन प्लॅन घेणे सर्वांसाठी गरजेचे आहे का?
या सबस्क्रिप्शन प्लान बाबत प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. या प्लॅन सर्वांसाठी अनिवार्य आहे का? तर असं अजिबात नाही. फेसबुक आणि इंस्टाग्राम विनामूल्य उपलब्ध राहतील. परंतु ज्यांना जाहिरातीची कटकट वाटते असे लोक हा सबस्क्रीप्शन प्लॅन घेऊन विना जाहिरात फेसबुक आणि इंस्टाग्रामचा आनंद घेऊ शकतील. जे लोक एकत्र कौटुंबिक वातावरणात राहतात अशा लोकांसाठी हे फायदेशीर ठरू शकत कारण एकाच सदस्यांच्या सबस्क्रीप्शनवर संपूर्ण कुटुंब हा अनुभव घेऊ शकेल.