Chanakya Niti : ‘या’ चुकीच्या सवयीमुळे मनुष्य नेहमी दारिद्र्यात राहतो

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य  यांनी जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रह पैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. नीतीशास्त्र आपल्या सर्वांच्या ओळखीतील संग्रह आहे. आचार्य चाणक्य यांनी  कुटुंब, वैवाहिक जीवन, माता पिता, संतान  यांच्याबाबत देखील काही नीती सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मते तुमचं भविष्य उज्वल बनवण्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे आणि  ते विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जीवनात यशस्वी होण्यासाठी वाईट लोकांपासून दूर राहणे देखील गरजेचे असल्याचं सांगितलं आहे. काही व्यक्तींना अशा काही सवयी असतात ज्यामुळे ते श्रीमंत होण्यापासून वंचित राहतात.  त्यानुसार काही सवयी व्यक्तींनी सोडून द्यायला हव्यात.

   

१) किचनमध्ये उष्टे भांडे ठेवू नये

आचार्य चाणक्य यांच्या मते, घरासोबतच किचनची साफसफाई करणे देखील अत्यंत गरजेचे आहे.  त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर महिला उष्टे भांडे तसेच पडू देतात.  किचनमध्ये कधीच उष्टे भांडे ठेवू नका.  बरेचदा आपण रात्रीचे जेवणाचे भांडे घासण्याचा कंटाळा करतो.  त्यामुळे ते भांडे तसेच पडून राहतात.  यामुळे व्यक्तींना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. हिंदू धर्मानुसार किचन मध्ये उष्टे भांडे ठेवल्यामुळे आणि स्वच्छता न राखल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि यामुळे दरिद्री येऊ शकते.

२) कोणाचाही अपमान करू नये

आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याची वागणूक आणि व्यवहारावरून त्याचा स्वभाव समजत असतो.  त्याचबरोबर जो मनुष्य वृद्ध, विद्वान, गरीब, आणि महिलांचा अपमान करतो, त्यांच्या घरात कधीच माता लक्ष्मी येत नाही. बरेच व्यक्ती स्वतःला मोठे समजून दुसऱ्यांचा अपमान करत असतात. त्याचबरोबर गरिबाला असे व्यक्ती कधीच मदत करत नाही.  जर दुसऱ्यांसोबत चुकीचा व्यवहार केला तर माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे कधीही कोणत्याही व्यक्तीसोबत आदराने वागा.

३) मधुर वाणी

एखादा व्यक्ती गोड बोलण्याने दुसऱ्यांचे मन जिंकून घेत असतो. असे व्यक्ती कधीही  मागे राहत नाही. ते त्यांच्या मधुर वाणीने सर्वांचे मन जिंकून घेतात आणि त्यांचे काम करून घेतात. त्यामुळे कधीही मधुर बोलले पाहिजे. काही व्यक्ती बोलत असताना चुकीच्या शब्दांचा वापर करतात. अशा व्यक्तींची ही सवय  त्यांना श्रीमंत बनण्यापासून रोखते. त्यामुळे अशा व्यक्तींनी त्यांची ही सवय सोडून मधुर वाणी मध्ये बोलले पाहिजे. कठोर बोलण्यापेक्षा मधुर वाणी बोलून केलेले काम कधीही यशस्वी होते.