WhatsApp आणतंय नवं फीचर्स; चॅट आणि ग्रुपमध्ये मेसेज पिन करता येणार

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. यासोबतच आता Whatsapp मध्ये आणखीन फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहे. व्हाट्सअप कडून चॅट किंवा ग्रुप पिन करण्याच्या नवीन फीचर वर काम सुरू आहे. त्यानुसार तुम्हीतुमच्या चॅट मधील किंवा ग्रुप मधील मेसेज पिन करू शकता.

   

Whatsapp च्या या अपकमिंग फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला गरजेचे असलेले मेसेज पिन करू शकतात. हे पिन केलेले मेसेज चॅटच्या वरच्या बाजूला ३० दिवसांपर्यंत दिसतील. कंपनीकडून या फिचरवर बऱ्याच काळापासून काम सुरू आहे. आता लवकरच काही बीटा टेस्टरसाठी हे फीचर उपलब्ध करण्यात येणार आहे. या फिचर बद्दल माहिती देत WABetaInfo या वेबसाईटने स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

Whatsapp च्या अपकमिंग फीचरमध्ये तुम्हाला पिन केलेल्या मेसेजचा टाइमिंग वाढवण्याची तसेच कमी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार तुम्ही 24 तास 7 दिवस किंवा 30 दिवसांपर्यंत मेसेज पिन करून ठेवू शकता. त्यानुसार तुम्ही कधीही हे मेसेज अनपिन करू शकतात. एखाद्या चॅट वर तुम्हाला मेसेज पिन करायचा असेल तर तुम्हाला तो मेसेज क्लिक करून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पिन फीचर उपलब्ध होईल. मिळालेल्या माहितीनुसार Whatsapp चॅट मध्ये आणखीन एक फीचर लॉन्च करण्यात येणार आहे. Whatsapp सध्या चॅटसाठी अटॅचमेंट मेन्यू आयकॉन डिझाईन करत आहे. त्यानुसार तुम्हाला Whatsapp मध्ये बरेच बदल दिसू शकतील.आणि फोटोमध्ये अटॅचमेंट मेनू दिसेल.