टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बनवत आहेत. सातत्याने नवनवीन आणि अपडेटेड फीचर्समध्ये या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येत असून येथेही जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Pure EV ने आपली ePluto 7G Max ही इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. खास बाब म्हणजे ePluto 7G Max तब्बल 201 किलोमीटर इतकी रेंज देत असून भारतीय मार्केट मध्ये Ola- Ather ला जोरदार टक्कर देईल. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेऊयात.
epluto 7G Max या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 3.5 kwh क्षमतेची हेवी ड्युटी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी CAN आधारित चार्जरने तुम्ही चार्ज करू शकता. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये देण्यात आलेली मोटर 2.4 kw पॉवर देते. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 201 किलोमीटर अंतर पार करू शकते. त्यामुळे लांबच्या पल्ल्यासाठी सुद्धा epluto 7G Max ही एक उपयुक्त गाडी ठरू शकते. कंपनीने ही स्कूटर मॅट ब्लॅक कलर, रेड, ग्रे आणि व्हाईट या चार कलर ऑप्शन मध्ये बाजारात आणली आहे.
epluto 7G Max या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ७ वेगवेगळे मायक्रो कंट्रोलर आणि बरेच सेंसर देण्यात आले आहेत. हे सेंसर भविष्यामध्ये OTA फॉर्म वेअर अपडेटसह उपलब्ध होतील. या मॉडेलमध्ये स्मार्ट BMS आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध करण्यात आली आहे. यासोबतच हिल स्टार्ट असिस्ट, डाऊन हिल असिस्ट, कोस्टिंग रीजनरेशन, रिव्हर्स यासारखे फीचर्स या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देण्यात आले आहे.
यावेळी, Pure EVया कंपनीचे सह संस्थापक आणि CEO रोहित वडेराय यांनी सांगितलं की, epluto 7G Max मध्ये देण्यात आलेली बॅटरी ही स्टेट ऑफ चार्ज आणि स्टेट ऑफ हेल्थ साठी AI सक्षम पावर डिस्चार्ज अकाउंटिंगसाठी सक्षम आहे. ही बॅटरी लाईफ 50% सुरक्षित बनवते. त्याचबरोबर ब्रेकिंग, रोलिंग व्हील स्पीड यामध्ये बराच सुधारणा करण्यात आल्या आहे.