टाईम्स मराठी । आपण घराची साफसफाई करत असताना, महत्त्वाची वस्तू स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करतो. या वस्तूकडे सर्वात अगोदर पाहुणे आल्यावर लक्ष जाते. ते म्हणजे स्विच बोर्ड. स्वीच बोर्डवर वर्षानुवर्षे घाण साचुन काळे डाग पडतात. डाग एवढे पक्के असतात की ते सहजरीत्या निघत नाही. काहीजण तर कंटाळून मेन स्विच बोर्ड बदलून टाकतात. पण आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत अशा काही ट्रिक्स ज्यामुळे तुम्ही सहजरीत्या घराची साफसफाई आणि स्विच बोर्ड साफ करू शकाल.
स्विच बोर्ड साफ करण्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागते. कारण स्विच बोर्ड मध्ये इलेक्ट्रिक करंट असल्यामुळे आपण त्या ठिकाणी पाणी वापरू शकत नाही. अशावेळी सर्वात अगोदर घरातील मेन स्विच बंद करा. त्यानंतर पायात चप्पल आणि हातामध्ये ग्लोज घालून तुम्ही साफसफाई करू शकतात. वर्षानुवर्ष जमलेले काळे डाग काढण्यासाठी तुम्हाला काही घरगुती गोष्टींचा वापर करावा लागेल.
- बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हे एक प्रकारे ऍसिड असतं. काळे हट्टी डाग काढण्यासाठी हे फार उपयुक्त आहे. त्यासाठी तुम्हाला अगोदर बेकिंग सोडा एका वाटीमध्ये घ्यावा लागेल. त्यानंतर लिंबाचा रस घ्या. लिंबाचा रस बेकिंग सोडा वर घालून मिक्स करा. आणि हे मिश्रण स्विच बोर्ड वर लावा आणि पाच-दहा मिनिटानंतर थोड्या ओल्या फडक्याने पुसून घ्या.
- विनेगर
स्विच बोर्ड ला स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर हा उत्कृष्ट घरगुती उपाय आहे. या उपायासाठी विनेगर आणि लिंबाचा रस ब्रशच्या मदतीने स्विच बोर्डवर लावा. त्यामध्ये थोडासा सोडा टाका. हे मिक्स करून पुन्हा स्विच बोर्डवर लावा. यानंतर थोड्यावेळाने ओल्या फडक्याने पुसून घ्या
- ऑलिव्ह ऑइल
हा उत्तम असा घरगुती उपाय आहे. हे ऑलिव्ह ऑइल स्विच बोर्डवर लावा आणि ब्रश च्या सहाय्याने क्लीन करा.
या पद्धतीने स्विच बोर्ड साफ केल्यानंतर लगेचच आपण बंद केलेले मेन स्विच चालू करू नका. कारण आपण साफ केलेल्या बोर्ड मध्ये अजून ओलावा असू शकतो. तो ओलावा सुकल्यानंतर 30-40 मिनिटानंतर तुम्ही मेन स्विच सुरू करू शकतात. जेणेकरून ओलावा निघून जाईल आणि करंट बसणार नाही.