Chanakya Niti : कोणत्या ठिकाणी घर बांधावं? चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स पहाच

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. आचार्य चाणक्य हे प्राचीन काळातील नीतिशास्त्रज्ञ असून त्यांनी मनुष्याला जीवनात कस जगावं. काय करावे? यशस्वी होण्यासाठी कस राहावे याबाबत मार्गदर्शन केलं आहे.आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या मते, ज्या ठिकाणी तुम्ही भविष्यामध्ये घर घेऊ इच्छित असाल ती जागा संपूर्ण दृष्ट्या योग्य असणे गरजेचे आहे. परंतु आपण घर बांधण्याचे नियोजन करत असताना या कोणत्याच गोष्टीचा विचार लक्षात घेत नाही. परंतु यामुळे पुढे चालून बरेच प्रॉब्लेम्स उद्भवतात. त्यानुसार आचार्य चाणक्य यांनी घर बांधण्यासाठी योग्य जागा कोणती हे सांगितलं आहे.

   

मानसन्मान मिळत नसलेल्या देशात राहू नये

आचार्य चाणक्य यांच्यामध्ये, ज्या देशांमध्ये  एखाद्या व्यक्तीला मान सन्मान दिला जात नाही अशा ठिकाणी घर बांधण्याचे नियोजन करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यापेक्षा तुम्ही खेड्यामध्ये ज्या ठिकाणी मान सन्मान इज्जत दिली जाते त्या ठिकाणी घर बांधण्याचे नियोजन करत असाल तर ती जागा अत्यंत योग्य आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते एखादा व्यक्ती स्वदेशातून दुसऱ्या देशामध्ये नोकरी व्यवसायासाठी जात असतो. यासोबतच नवीन रोजगार, काही गोष्टी शिकण्यासाठीचा उद्देश मनात बाळगून असे व्यक्ती दुसऱ्या देशांमध्ये राहण्यास जातात. पण एखादा व्यक्ती जर रोजगार किंवा काही शिकण्यासाठी दुसऱ्या देशामध्ये जात नसेल, तर हे अत्यंत चुकीचे आहे.

शेजारी ब्राह्मण नसल्यास त्या ठिकाणी घर बांधणे उचित नाही

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या ठिकाणी तुम्ही घर बांधण्याचे नियोजन करत आहात, त्या ठिकाणाच्या जवळपास वेदांची माहिती असलेले ब्राह्मण नसतील तर त्या ठिकाणी घर बांधणे उचित नाही. त्याचबरोबर जर तुम्ही बांधत असलेल्या घराजवळ नदी नसेल तर चुकूनही त्या ठिकाणी घर बांधकाम करू नये. अशा ठिकाणी जाऊन व्यक्तीचे राहणे अत्यंत चुकीचे आहे.

ज्या ठिकाणी शिक्षा आणि दंड दिला जात नाही त्या ठिकाणी राहू नये

चाणक्यनीती नुसार, (Chanakya Niti) ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिक्षा किंवा दंड दिला जात नसेल तर त्या ठिकाणी मनुष्य प्राण्यांनी राहणे योग्य आहे. आयुष्य जगण्यासाठी व्यक्तींना त्यांच्या चुका समजणे, त्यांच्या चुकांवर पांघरूण न घालता त्यांना शिक्षा देणे हे अत्यंत गरजेचे असते. ज्यामुळे या चुकांमधून व्यक्ती शिक्षित होईल. आणि व्यवसाय विकसित करण्याचे साधन जोपासू शकेल.

ज्या ठिकाणी मिळून मिसळून राहिले जाते त्या ठिकाणी राहा

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तींच्या हितासाठी काही कार्य केले जातील त्या ठिकाणी व्यक्तींनी घर बांधण्याचे नियोजन केले पाहिजे. यासोबतच ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती एकत्र मिळून मिसळून राहतो त्या ठिकाणी  व्यक्तीने  राहिले पाहिजे. जेणेकरून परिवारामध्ये सकारात्मक वातावरण  निर्माण होते. अशा ठिकाणी राहिल्यास  मानसन्मान देखील मिळतो.