टाईम्स मराठी । भारतीय ऑटोबाजारात सतत एकामागून एक दमदार गाड्या लाँच होत असतात. त्यातच स्पोर्ट बाईक्स ला तरुण वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने अनेक कंपन्यां आपल्या स्पोर्ट बाईक्स बाजारात उतरवत असतात. नुकतंच बाजारात Ducati Panigale V4R ही बाईक लॉन्च झाली असून Suzuki Gixxer SF ही बाईक सुद्धा एक महिन्यापूर्वी लॉन्च करण्यात आली होती. तुम्हाला या दोन्हीतील कोणती बाईक घ्यावी यावरून मनात गोंधळ असेल तर आज आम्ही दोन्ही गाड्यांचे फीचर्स, इंजिन क्षमता मायलेज आणि किंमत याबाबत संपूर्ण माहिती देणार आहोत, त्यावरून तुम्हीच ठरवा नेमकी कोणती गाडी तुमच्यासाठी बेस्ट आहे.
वजन –
Suzuki Gixxer SF आणि Ducati Panigale V4R या दोन्ही बाइकच्या तुलनेत Suzuki Gixxer SF या बाईकचे वजन 148 किलोग्रॅम असून बाईकला समोर टेलीस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक अॅडजस्टेबल सस्पेंशन आहे त्यामुळे गाडी चालवणं अत्यंत आरामदायी वाटत. दुसरीकडे Ducati Panigale V4R चे वजन 193.5 किलोग्रॅम एवढे आहे.
इंजिन –
Suzuki Gixxer SF आणि Ducati Panigale V4R या दोघांच्या इंजिन आणि परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर, Suzuki Gixxer SF मध्ये हाय पावर 155cc इंजिन असून हे इंजिन 5 गियर मॅन्युअल ट्रान्समिशनला जोडलेलं आहे. हे इंजिन13.4 बीएचपी पावर आणि 13.8 Nm चा पिक टॉर्क जनरेट करते . दुसरीकडे, Ducati Panigale V4R या सुपर बाईक मध्ये 998 सीसी इंजिनचा वापर केला गेला असून रेगुलर मॉडेल मध्ये 1103cc क्षमता असलेले इंजिन वापरण्यात आले. हे स्पीड 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशला जोडलेलं आहे. हे इंजिन 15,500 rpm वर 215 Bhp ची पॉवर जनरेट करते. तसेच, अक्रापोविक एक्झॉस्ट एकूण आउटपुट 234 Bhp पर्यंत वाढवते.
फीचर्स –
Suzuki Gixxer SF या बाईकमध्ये सिंगल चैनल एबीएस, फुल एलईडी हेडलैप, टेल युनिट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्लिप ऑन हँडलबार, आणि स्प्लिट सीट यांसारखे फीचर्स मिळतात. तरDucati Panigale V4R मध्ये टॅंक इन्व्हो आणि रिकॅलिब्रेट डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, राइड बाय वायर आणि इंजिन ब्रेक कंट्रोल EVO2 सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे.
किंमत किती?
Suzuki Gixxer SF बाईकची सुरुवातीची किंमत 1 लाख 35 हजार 713 एवढी ठेवण्यात आली आहे. तर Ducati Panigale V4R ची किंमत तब्बल 70 लाख रुपये इतकी आहे.