टाइम्स मराठी । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Honda नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेल्या गाड्या बाजारात आणत असते. मागील ६ महिन्यात होंडा कंपनीने एक्टिवा लिमिटेड एडिशन, SP 125 स्पोर्ट एडिशन, होर्नेट 2.0, डिओ 125 रेप्सोल एडिशन, अपडेटेड सीबी 200 X यासारख्या बऱ्याच बाईक लाँच करत बाजारात आपली पकड मजबुत केली होती. त्यातच आता कंपनी आणखी एक बाईक Honda CB 350 Legend Limited Edition लाँच करणार असून याचा टीझर समोर आणला आहे. सध्या या बाईकवर काम सुरू असून लवकरच ती बाजारात आणली जाईल.
Honda CB 350 Legend Limited Edition मध्ये कंपनी रेट्रो कलर थीम लॉन्च करणार आहे. होंडा कंपनीने याच वर्षी या बाईकचे कस्टम किट अपडेट केले होते. होंडा कंपनीच्या या नवीन स्पेशल एडिशन बाईकच्या टिझर मध्ये नवीन ग्राफिक्स आणि कलर्स स्कीम पूर्णपणे नवीन दिसत आहे. यामध्ये पिवळा निळा आणि पांढरा कलर कॉम्बिनेशन मध्ये नवीन पीनस्ट्राइक बघायला मिळाले.
स्पेसिफिकेशन
Honda CB 350 Legend Limited Edition मध्ये कॉस्मेटिक पडेट देण्यात येणार नाही. याशिवाय दुसरे काही अपडेट बघायला मिळतील. या बाइकमध्ये 348 सीसी इंजिन देण्यात येईल. हे इंजिन एअर कूल्ड फ्यूल इंजेक्टेड टेक्नॉलॉजीने सुसज्ज असून 20.7 bHP पॉवर आणि 30 NM पिक टॉर्क जनरेट करते.हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सने सुसज्ज करण्यात आले आहे.
अन्य फिचर्स
Honda CB 350 Legend Limited Edition मध्ये टेलीस्कॉपिक फ्रंट फॉर्क्स, ट्विन शॉक अब्जोर्बर देण्यात आले आहे. या बाईक मध्ये फ्रंट आणि रियल मध्ये डिस्क ब्रेक वापरण्यात आले असून ABS चॅनेल सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल आणि bluetooth कनेक्टिव्हिटी यासारखे फीचर्स उपलब्ध आहेत.