Chanakya Niti : आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये अनेकांना मार्गदर्शक सल्ले दिले आहेत. चाणक्य नीतीचे पालन केल्याने नक्कीच आपल्या जीवनाला नवी दिशा मिळेल. आयुष्य कस जगावे, यशस्वी होण्यासाठी काय करावे याबाबत चाणक्यांनी अनेक तत्वे सांगितली आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मते, आयुष्यामध्ये कधीच काही महिलांचा अपमान करू नये. या महिला कोण आहेत तेच आज आपण जाणून घेऊयात….
आई –
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जो व्यक्ती आईची सेवा करतो, त्या व्यक्तीला कधीच कोणत्या संकटांचा सामना करताना अडचणी येत नाही. अशी व्यक्ती स्वर्गात जातात. आईची सेवा करणे हे संपूर्ण देवतांची सेवा करण्यायोग्य आहे. त्यामुळे आईची सेवा करत रहा. यामुळे तुम्हाला चांगले फळ मिळत राहील. त्याचबरोबर कधीच आपल्या आईचा अपमान करू नका. आईचा अपमान केल्यास तुम्हाला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
गुरुच्या पत्नीचा अपमान करू नये– Chanakya Niti
कधीच कोणत्याही राजाच्या पत्नीचा आणि गुरूच्या पत्नीचा अपमान करू नये. या महिलांचा कधीही सन्मान करणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे आईची सेवा केली जाते त्याच प्रकारे या दोन्ही महिलांची सेवा करणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडून चुकूनही यांचा अपमान होत असेल तर लगेच चूक कबूल करून माफी मागितली पाहिजे. त्याचबरोबर आचार्य चाणक्य म्हणतात, मित्राची पत्नी, वहिनी देखील आई समान असते. चुकूनही त्यांचा अपमान करू नये.
आईप्रमाणे सासूची देखील करा सेवा
आचार्य चाणक्य यांच्यानुसार (Chanakya Niti) पत्नीची आई किंवा पतीची आई म्हणजेच सासूबाई ही देखील एक आई असते. आपल्या आईप्रमाणे सासुबाईंची देखील सेवा केली पाहिजे. चुकूनही तुमच्या सासूचा अपमान करू नये, यामुळे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. ज्याप्रमाणे आपली आई असते त्याचप्रमाणे सासू देखील आईच असते. ज्याप्रमाणे आपल्या आईने आपल्याला सांभाळले आहे त्याचप्रमाणे सासूने देखील त्यांच्या मुलाला किंवा मुलीला सांभाळलेले असते.