टाइम्स मराठी । सध्या सर्वत्र सणासुदीचा काळ असून याचा पार्श्वभूमीवर ग्राहकांना खुश करण्यासाठी प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी आणि महिंद्राने आपल्या काही गाड्यांवर बम्पर सूट दिली आहे. या माध्यमातून तुम्ही अगदी कमी पैशात गाडी खरेदी करू शकता आणि सणासुदीला घरी घेऊन जाऊ शकता. उद्या म्हणजेच 15 ऑक्टोंबर पर्यंत ग्राहकांना हा डिस्काउंट मिळणार आहे. चला तर जाणून घेउया नेमक कोणत्या गाडीवर किती रुपयांचा डिस्काउंट कंपनी कडून देण्यात आला आहे.
महिंद्रा बोलेरो नियो (Mahindra Bolero Neo)
महिंद्रा कंपनीच्या महिंद्रा बोलेरो नियो या कारमध्ये 1.5-लीटर डीजल इंजन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड मैनुअल ट्रांसमिशन सह 100hp पॉवर जेनरेट करते. या कारच्या व्हेरिएंटची किंमत वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. त्यानुसार या फेस्टिवल सीझनमध्ये तुम्ही महिंद्राची बोलेरो नियो खरेदी करणार असाल तर तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. याशिवाय तुम्ही महिंद्राची बोलेरो नियो च्या N4 आणि N8 ट्रिम हे व्हेरिएंट खरेदी करू इच्छित असाल तर 5000 रुपये आणि 11,000 रुपये डिस्काउंट देण्यात येत आहे. याशिवाय N10 आणि N10 ( O ) या वेरियंटवर देखील डिस्काउंट ऑफर मिळत आहे. त्यानुसार तुम्ही ही कार 30,000 रुपयांच्या डिस्काउंट ऑफर नुसार खरेदी करू शकतात.
महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero)
महिंद्रा कंपनीच्या महेंद्रा बोलेरो या कार मध्ये1493 cc इतके इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 1 डिझेल इंजिन मध्ये उपलब्ध आहे. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत उपलब्ध असून या कार सोबत ५ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आलेले आहे. महिंद्रा बोलेरो कार दिवाळी आणि दसऱ्याच्या फेस्टिवल सीजनच्या निमित्ताने डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही महिंद्रा बोलेरो 70,000 रुपयांच्या डिस्काउंट नुसार खरेदी करू शकतात. त्याचबरोबर B6 व्हेरीएंटवर 15000 रुपयांपर्यंत आणि B6 O या व्हेरिएंट वर 50,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. एवढेच नाही तर महिंद्रा बोलेरो वर 20,000 रुपयांपर्यंत फ्री ॲक्सेसरीज देखील मिळत आहे.
महिंद्रा मराझ्झो (Mahindra Marazzo)
महिंद्रा कंपनीची महिंद्रा मराजो ही कार 1.5 लिटर डिझेल इंजिन 1497 cc सह उपलब्ध असून 123 hp पॉवर आणि 300NM टॉर्क जनरेट करते. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आलेले आहे. महिंद्रा कंपनीच्या या महिंद्रा मराजो च्या सर्व व्हेरिएंट वर 73,300 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. त्यानुसार या फेस्टिवल सीझनमध्ये तुम्ही या कारवर बंपर डिस्काउंट मिळवू शकतात.
Maruti Suzuki Ignis
Maruti Suzuki Ignis या कारमध्ये 1.2 लिटर 4 सिलेंडर K12 पेट्रोल इंजन उपलब्ध आहे. हे इंजन 83 Hp पावर आणि 113 nm पिक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर या इंजिन सोबत पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअर बॉक्स देण्यात आले आहे. यामध्ये देण्यात आलेल्या फिचर्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 7.0 इंच टच स्क्रीन इम्पॉर्टंट सिस्टीम उपलब्ध आहे. ही सिस्टीम स्मार्ट प्ले स्टुडिओ ने सुसज्ज आहे. याशिवाय वाय रीकोग्नायझेशन सिस्टीम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअर बॅग, रियर पार्किंग सेंसर, ABS यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. या कारची सुरुवाती किंमत 5.84 ते 8.30 लाख रुपये एवढी आहे. परंतु फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून मारुती सुझुकीच्या या कारच्या दोन्ही व्हेरिएंटवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यापैकी मॅन्युअल व्हेरिएंट वर कंपनीकडून 65000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. आणि ऑटोमॅटिक व्हेरीएंटवर 60 ,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.
Maruti Suzuki Baleno
Maruti Suzuki Baleno ही कार 9 व्हेरीएंट आणि सात कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 90 PS पावर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी बलेनो या कारच्या मायलेज बद्दल बोलायचं झालं तर ही कार 22.35 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. या कार मध्ये पेट्रोल इंजिन सोबत पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आले आहे. या गाडीची किंमत 6.61 लाख ते 9.81 लाख रुपये एवढी आहे. कंपनीकडून फेस्टिवल सीझनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या डिस्काउंट ऑफरनुसार, या कारच्या पेट्रोल आणि मॅन्युअल दोन्ही व्हेरिएंट वर 40,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. आणि CNG व्हेरिएंट वर 55000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.
Maruti Suzuki Ciaz
Maruti Suzuki Ciaz या कारमध्ये एक पॉईंट पाच लिटर K सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 103 BHP पॉवर आणि 138 NM पिक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये माइल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली असून या टेक्नॉलॉजीमुळे मायलेज मोठ्या प्रमाणात मिळते. या कारच्या मायलेज बद्दल बोलायचं झालं तर या गाडीचे मायलेज 22 किलोमीटर प्रति लिटर एवढे आहे. या कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ४ स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स देण्यात आले आहे. या कारची सुरुवाती किंमत 9.30 लाख ते 12.45 रुपये एवढी आहे. या सेडान कार वर कंपनीकडून फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून सर्व व्हेरियंटवर 53,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. Maruti आणि Mahindra च्या या कार वर मिळत असलेल्या डिस्काउंट ऑफर फक्त 15 ऑक्टोबर पर्यंत उपलब्ध आहेत.