टाइम्स मराठी | देशातील युवा वर्गाला बाईकचे मोठ्या प्रमाणात आकर्षण असते. त्याचबरोबर ऑफ रोडींग बाइक्सला तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. या बाईक्स चा वापर करून आपण पहाडी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात राइड करू शकतो. त्यातच तरुणांमध्ये बुलेटची वेगळे क्रेज पाहायला मिळते. त्यातच जर तुम्ही रॉयल एनफिल्ड हिमालयान ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. येत्या दिवाळीत म्हणजे 7 नोव्हेंबर ला कंपनी Royal Enfield Himalayan 452 नव्या इंजिन फीचर्स सह लाँच करणार आहे.
कंपनीकडून या नवीन वेरियंटमध्ये बरेच बदल आणि अपडेट उपलब्ध करण्यात येणार आहे. ही नवीन अपकमिंग बाईक 7 नोव्हेंबरला विक्रीसाठी खुली होणार आहे. ही बाईक 2.70 लाख रुपयांच्या एक शोरूम किमतीमध्ये उपलब्ध होऊ शकते. आज आपण या बाईकचे खास फीचर्स जाणून घेऊया.
लूक आणि डिझाईन-
Royal Enfield Himalayan 452 चे अपडेटेड मॉडेल अगोदरच्या व्हेरिएंट पेक्षाही अप्रतिम आणि दमदार लूक मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. या मध्ये सर्वात मोठा फ्युल टॅंक देण्यात येणार आहे. हा फ्युएल टॅंक स्प्लिट सीट सह एक पेटिट टेल सेक्शन मध्ये उपलब्ध होईल. या नवीन वेरीएंटमध्ये समोरील मडगार्डवर हिमालयान ब्रॅण्डिंग करण्यात आली आहे. आणि फ्युएल टॅंक साइड पॅनल आणि रियलवर फेंडरमध्ये हिमालय ग्राफिक्स उपलब्ध करण्यात आले आहे.
इंजिन– Royal Enfield Himalayan 452
Royal Enfield Himalayan 452 च्या अपडेटेड बाईक मध्ये कंपनीने 451.65 CC इंजिन दिले आहे. हे लिक्विड कुल्ड इंजिन आहे. हे इंजिन 8000 RPM वर 29.57 BHP पावर आणि 40 ते 45 NM पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिन सोबत 6 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स उपलब्ध करून दिले आहेत.
अन्य फीचर्स-
गाडीच्या अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Royal Enfield Himalayan 452 च्या अपडेटेड व्हर्जन मध्ये LED टर्न इंडिकेटर्स, LED हेडलॅम्प, छोटी विंडशिल्ड, एक नवीन बिक, इंटर कुलर, ग्रँड हँडल, नवीन एक्झॉस्ट यासारखे नवीन फीचर्स उपलब्ध करण्यात येणार आहे. ही नवीन बाईक KTM 390 ॲडव्हेंचर, BMW G 310, YEZDI एडवेंचर यासारख्या बाईकला टक्कर देईल.