टाइम्स मराठी । भारतातील हिरो मोटोकॉर्प नंतर दुसरी सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणजे Honda . होंडा कंपनीने काही दिवसांपूर्वी स्पेशल एडिशन बाईकचा टीजर लॉन्च केला होता. त्यानुसार आता कंपनीने Honda CB350 आणि Honda CB350RS चे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. यातील HONDA CB350 ही बाईक लिगेसी एडिशन आणि HONDA CB350RS ही बाईक न्यू एडिशन बाईक आहे. तुम्ही जर नवीन वर्षात नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही लेटेस्ट लॉन्च झालेली नवीन बाईक अप्रतिम ठरेल.
फीचर्स
Honda CB350 आणि Honda CB350RS या दोन्ही स्पेशल एडिशन बाईक मध्ये ऑल LED लाइटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. म्हणजेच या सिस्टीम मध्ये गोल एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स, एलईडी टेललॅम्प उपलब्ध करण्यात आला आहे. यासोबतच दोन्ही स्पेशल एडिशन बाईक मध्ये स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीम, ॲडव्हान्स डिजिटल एनालॉक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रेट्रो बाईक असिस्ट स्लीपर क्लच, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल HSTC सिस्टीम देण्यात आली आहे.
ग्राफिक्स आणि कलर
Honda CB350 आणि Honda CB350RS ही स्पेशल एडिशन बाईक नवीन पल सायरन ब्ल्यू कलर स्कीम मध्ये डेव्हलप करण्यात आली आहे. त्यानुसार यामध्ये नवीन बॉडी ग्राफिक्स उपलब्ध असून लिगेसी एडिशन बेंज देखील उपलब्ध आहे. हे स्पोर्ट रेड आणि ऍथलेटिक ब्लू मेटॅलिक पेंट स्कीम मध्ये उपलब्ध होईल. त्याचबरोबर यामध्ये बॉडी कलर रियर ग्रॅब हँडल आणि हेडलाईट कव्हर देखील करण्यात आले आहे.
स्पेसिफिकेशन
Honda CB350 आणि Honda CB350RS या स्पेशल एडिशन मध्ये 348.36 Cc इंजिन देण्यात आले होते. हे इंजिन एअर कूल्ड फ्यूल इंजेक्टेड टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. त्याचबरोबर हे इंजिन 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, BS-VI, OBD2 ने सुसज्ज आहे. होंडाच्या या बाईकचे इंजिन सुद्धा दमदार असून 20.7 BHP पावर आणि 30 NM पिक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
किंमत
HONDA CB350 आणि HONDA CB350RS या स्पेशल एडिशन बाईकची किंमत पाहिल्यास HONDA CB350 या स्पेशल एडिशन बाईक ची किंमत 2,16,356 रुपये एवढी आहे. आणि HONDA CB350RS या स्पेशल एडिशन बाईक ची किंमत 2,19,357 रुपये आहे.