Maruti Cars Discount : मारुतीच्या ‘या’ गाड्यांवर बंपर सूट; सणासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद होणार द्विगुणित

टाइम्स मराठी । सध्या फेस्टिवल सीजनची सर्वत्र तयारी सुरू आहे. सणासुदीच्या या काळात भारतात दसरा आणि दिवाळीला कार खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेक ग्राहक वर्षातील या दोन सणांना कार खरेदी करण्याचा विचार करत असतात. त्यानुसार तुम्ही देखील या फेस्टिवल सीजन मध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही कारवर मिळणाऱ्या डिस्काउंट ऑफर बद्दल सांगणार आहोत. ग्राहकांना खुश करण्यासाठी प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या काही कारवर भारी डिस्काउंट ऑफर (Maruti Cars Discount) करत आहे. जर तुम्ही देखील मारुती सुझुकीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 68 हजार पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. यासोबतच कंपनीने काही मॉडेलवर कॉर्पोरेट डिस्काउंट एक्सचेंज बोनस उपलब्ध केला आहे. त्यानुसार तुम्ही या फेस्टिवल सीझनमध्ये कमी किमतीमध्ये कार घरी घेऊन जाऊ शकतात.

   

मारुती सुझुकी बलेनो

या लिस्टमधील सर्वात पहिली कार म्हणजे मारुती सुझुकी बलेनो. ही कार 9 व्हेरीएंट आणि सात कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. या कार मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 90 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी बलेनो या कारच्या मायलेज बद्दल बोलायचं झालं तर ही कार 22.35 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. त्याचबरोबर मारुती सुझुकीच्या या बलेनो मध्ये CNG व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे. सध्या सुरु असलेल्या डिस्काउंट ऑफर नुसार, (Maruti Cars Discount) या कारच्या पेट्रोल वेरिएंटवर 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. आणि CNG व्हेरिएंट वर 55 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

मारुती स्विफ्ट– Maruti Cars Discount

मारुती स्विफ्ट या कार मध्ये 1.2 L 4 सिलेंडर, 1.2 L 4 सिलेंडर नॅचरल गॅस इंजिन देण्यात आले आहे. या कारची इंधन टाकी क्षमता 37 ते 55 लिटर एवढी आहे. या कारमध्ये देण्यात आलेले इंजन 90 पीएस पावर आणि 113 Nm पीक टॉक जनरेट करते. यासोबतच CNG व्हेरीएंट मध्ये हे इंजिन 77.5 पी एस पावर आणि 98.5 NM पीक टॉर्क जनरेट करते. या कार मध्ये पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. जर तुम्ही ही पॉप्युलर फॅमिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 47,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर मिळू शकते. यासोबतच CNG व्हेरिएंट वर देखील कंपनी डिस्काउंट ऑफर उपलब्ध केली आहे.  त्यानुसार CNG व्हेरिएंट वर 33,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.

MARUTI WAGON R.

मारुती सुझुकीची  फॅमिली कार म्हणून ओळखली जाणारी MARUTI WAGON R. ही कार  दमदार मायलेज आणि फीचर्स सह उपलब्ध आहे. MARUTI WAGON R. ही हॅचबॅक कार चार व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी दोन व्हेरियंट CNG वर्जन मध्ये लॉन्च करण्यात आले आहे.  हॅचबॅक कार मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजन ऑप्शन देण्यात आले आहे. हे इंजन 90 PS पावर आणि 113 NM पिक टॉर्क जनरेट करते. हे इंजन पाच स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह उपलब्ध आहे. MARUTI WAGON R. या कारचे CNG व्हर्जन 57 PS पावर आणि 82.1 nm पिक टॉर्क जनरेट करते. ही कार पेट्रोल व्हेरिएन्ट मध्ये 25.19 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. आणि CNG व्हर्जन कार 34.05 किलोमीटर प्रती किलोग्राम एवढे मायलेज देते. MARUTI WAGON R. या हॅचबॅक कारची किंमत भारतीय बाजारपेठेमध्ये 5.55 लाख रुपये एवढी आहे. आणि या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 7.43 लाख रुपये आहे. तुम्ही ही फॅमिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या कालच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 46,000 रुपये डिस्काउंट देण्यात (Maruti Cars Discount) येत आहे. त्याचबरोबर CNG व्हेरिएंटवर 58,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर करण्यात आला आहे.

Maruti Suzuki S-Presso

Maruti Suzuki S-Presso ही प्रचंड आकर्षक लुक मध्ये उपलब्ध असून यामध्ये सहा कलर ऑप्शन देण्यात आले आहे. Maruti Suzuki S-Presso ही कार पेट्रोल आणि CNG दोन्ही इंजिन ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1.0 लिटर  पेट्रोल इंजिन देण्यात आले असून हे इंजन 66 bhp पावर प्रदान करते. आणि 89 nm पीक टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकीची ही पेट्रोल वर चालणारी  कार 25.30 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. त्याचबरोबर या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन उपलब्ध करण्यात आले आहे. Maruti suzuki S-presso ही कार 4.26 लाख रुपये  एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध असून या कारच्या टॉप वेरीएंटची किंमत 6.12 लाख रुपये आहे. कंपनीकडून या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 51,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. आणि CNG व्हेरिएंट वर  68 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.