Royal Enfield Aurora 350 : तरुणांना बाईकचे मोठ्या प्रमाणात आकर्षण असते. त्याचबरोबर ऑफ रोडींग बाइक्सला तरुणांचा जास्त प्रतिसाद मिळत असतो. या बाईक्सचा वापर करून अवघड रस्त्यावर राईड करायला तरुणांना वेगळीच मजा येते. त्यातच Royal Enfield च्या बुलेट म्हणजे तर जीव कि प्राणच म्हणायला हवा. आता आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने Royal Enfield Aurora 350 नव्या फीचर्स सह लाँच केली आहे. ही आकर्षक लूक असलेली बाईक मार्केट मद्धे नक्कीच धुमाकूळ घातले यात शंका नाही. आज आपण या बाईकचे फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेऊयात.
डिझाईन
Royal Enfield Aurora 350 च्या नव्या व्हेरियंट मध्ये स्पोक व्हील्स, ट्यूब टायर उपलब्ध करण्यात आले आहे. या बाईकच्या इंजिन आणि एक्झॉस्टवर कंपनीने अट्रॅक्टिव्ह क्रोम फिनिशसह नवीन डिझाईन डेव्हलप केलं आहे. कंपनीने ऑरोरा ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये आकर्षक अशा ड्युअल टोन डिझाईन मध्ये साईड पॅनल आणि इंधन टॅंकला देखील नवीन लुक प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये हिरवा, नारंगी आणि गेरू हा कलर उपलब्ध आहेत. यामुळे साईड पॅनल आणि इंधन टाकीला अप्रतिम लूक मिळतो. आणि ऑरोरा ब्ल्यू कलर वेरिएंटला निळा आणि पांढऱ्या कलर ऑप्शनसह आकर्षक रंग देण्यात आले आहेत.
इंजिन –
Royal Enfield Aurora 350 मध्ये 349 सीसी सिंगल सिलेंडर, फ्यूल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6100 RPM वर 20.2 HP पावर आणि 27 NM पिक टॉर्क जनरेट करते. कंपनीने यामध्ये उपलब्ध केलेले इंजिन हे एयर कुल्ड असून यामध्ये दोन वॉल्व हेड ऑइलसह इंजिनला बॅलेन्सर शाफ्ट प्रदान करतो.
फीचर्स – Royal Enfield Aurora 350
रॉयल एनफिल्ड च्या नवीन मेरियट 350 ऑरोरा व्हेरियंटमध्ये कंपनीने ट्रिपल नेवीगेशन सिस्टीम, अप्रतिम विंडशील्ड डीलक्स टुरिंग सीट, साईड पॅनल, ॲल्युमिनियम स्विच क्यूब, एलईडी हेडलाईट, स्पोक व्हील्स आणि ट्यूब टायर्स, ट्रिपल नेवीगेशन सिस्टीम, डीलक्स टूरिंग सीट, यासारखे वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहे.
किंमत किती?
Royal Enfield Aurora 350 मध्ये कंपनीने तीन कलर ऑप्शन उपलब्ध केले आहे. त्यानुसार ऑरोरा ग्रीन, ऑरोरा ब्लू आणि ऑरोरा ब्लॅक हे कलर उपलब्ध आहेत. कंपनीने या बाईकमध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले आहेत. या बाईची एक शोरूम किंमत 2,19,900 रुपये आहे. बाजारात ही बाईक जावा बॉबर 42 आणि होंडा एच नेस 350 या गाडयांना फाईट देईल .