Honda Activa CNG : Honda Activa येणार CNG मध्ये; 90 ते 100 KM मायलेज देणार

टाइम्स मराठी । होंडा कंपनीची तर प्रसिद्ध स्कुटर ऍक्टिवा नेहमीच सर्वसामान्य ग्राहकांच्या पसंतीला पडते. भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी गाडी म्हणून ऍक्टिव्हा कडे बघितलं जाते. होंडाने सुद्धा ऍक्टिवा मध्ये सातत्याने नवनवीन बदल करत ग्राहकांच्या इच्छा पूर्ण केल्या. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त आहेत. अशावेळी ग्राहकांचा कल हा CNG किंवा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहे. Honda ने हीच गोष्ट डोळ्यासमोर आणत आपली प्रसिद्ध Honda Activa CNG मध्ये आणण्याचा विचार करत आहे. होंडा लवकरच Activa चे CNG व्हर्जन लाँच करणार असून असं झाल्यास ही देशातील सर्वात पहिली CNG वर चालणारी स्कुटर ठरेल.

   

स्कुटरला इतर दुचाकी पेक्षा जास्त मायलेज नसत त्यामुळे ग्राहकांना ती खिशाला परवडत नाही. परंतु Honda Activa CNG मध्ये लाँच झाल्यास मायलेजचा प्रश्नच राहणार नाही. कारण १ किलो CNG मध्ये Honda Activa तब्बल 90 ते 100 किलोमीटर मायलेज देऊ शकते. तसेच या स्कुटरमध्ये एकावेळी १० किलोपर्यंत CNG तुम्ही भरू शकता.

इन्स्टॉलेशन खर्च- Honda Activa CNG

काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये असलेल्या CNG किटमेकर कंपनीने Honda Activa मध्ये CNG किट इन्सर्ट केले होते. आणि हे यशस्वीपणे  सक्सेस देखील झाले होते. त्यावेळी इन्स्टॉलेशनचा खर्च 15 हजार रुपये एवढा होता. त्यावेळी कंपनीने सांगितलं होतं की, हा खर्च तुम्ही एका वर्षापेक्षाही कमी वेळेमध्ये काढून घेऊ शकतात.  कारण अजूनही पेट्रोल डिझेलचे गगनाला पोहोचले असले तरी सीएनजीच्या किमती कमी आहेत. पेट्रोल डिझेल आणि सीएनजी मध्ये 40 ते 50 रुपयांचा फरक पडतो.

किंमत किती?

Honda Activa ही स्कूटर CNG व्हेरियंट मध्ये लॉन्च झाल्यानंतर यामध्ये दोन सिलेंडर देण्यात येतील. या सिलेंडर मध्ये 10 किलोपर्यंत सीएनजी भरता येईल. आणि त्यानंतर ही स्कूटर 1 किलो सीएनजी मध्ये 100 किलोमीटर पर्यंत चालू शकते. अजून तरी होंडा कंपनीकडून याबाबत अधिकारी घोषणा करण्यात आली नसून या स्कूटरची किंमत 90 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत असू शकते.