टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरत आहे. मेटा कंपनी Whatsapp मध्ये उपलब्ध करत असलेले नवनवीन फीचर्स हे अप्रतिम असून या फीचर्समुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. परंतु आता काही युजर्सला Whatsapp वापरण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण 24 ऑक्टोबरपासून काही मोबाईलवर Whatsapp बंद करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर पासून काही जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर आणि iPhone वर Whatsapp काम करणार नाही. सध्या Whatsapp हे अँड्रॉइड व्हर्जन 4.1 वर चालते. परंतु Whatsapp 24 ऑक्टोंबर पासून फक्त अँड्रॉइड 5.0 या नवीन व्हर्जन वाल्या मोबाईल वरच काम करणार आहे. त्याचबरोबर आयफोन वापरणाऱ्यांमध्ये देखील ios 12 किंवा त्याच्यापेक्षा वरील वर्जन मध्येच Whatsapp काम करेल. ios 12 च्या खालील कोणत्या Smartphone मध्ये आता Whatsapp चालणार नाही.
कोणकोणत्या Mobile वर Whatsapp चालणार नाही –
अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्जन 4.1 किंवा त्यापेक्षा जुन्या OS वर्जन वर स्मार्टफोन चालणार नाही. यामध्ये Sony Xperia Z, LG Optimus G Pro, Samsung Galaxy S2, Samsung Galaxy Nexus, HTC Sensation, Motorola Droid Razr, Sony Xperia S2, Motorola Xoom, Samsung Galaxy Tab 10.1, Asus Eee Pad Transformer, Acer Iconia Tab A5003, Samsung Galaxy S, HTC Desire HD, LG Optimus 2X, Sony Ericsson Xperia Arc3, Nexus 7 (upgradable to Android 4.2), Samsung Galaxy Note 2, HTC ONE या मोबाईलचा समावेश आहे.
24 ऑक्टोबर पासून फक्त Whatsapp नव्हे तर बरेच एप्लीकेशन जुन्याऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणार नाही. याशिवाय नवीन सेक्युरिटी अपडेट शिवाय तुमचा स्मार्टफोन राहणार नाही आणि सायबर गुन्हे देखील यामुळे वाढतील. जर तुमचा स्मार्टफोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो हे तुम्हाला माहीत नसेल तर खालील पद्धतीने तुम्ही जाणून घेऊ शकतात.
1) तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये जा.
2) सेटिंग मध्ये गेल्यानंतर About phone हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
3). यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर डिटेल्सवर क्लिक करावे लागेल.
4) सॉफ्टवेअर डिटेल्स मध्ये गेल्यावर अँड्रॉइड व्हर्जन या कॅटेगिरीच्या खाली तुम्हाला तुमचा मोबाईल कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो हे समजेल.